स्वप्नील जोशींचे लवकरच वेब सिरीजमध्ये पदार्पण

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 6 March 2020


मराठी सिनेमासृष्टीतील आपल्या प्रेमळ प्रतिमेला छेद देण्यासाठी स्वप्नील जोशीने नुकताच "मोगरा फुलला" हा सिनेमा केला

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अग्रगण्य म्हणून ज्या अभिनेत्याची ओळख आहे असा आपल्या सर्वांचा लाडका स्वप्नील  जोशी सध्या वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहे. स्वप्नील जोशी या अभिनेत्याची प्रतिमा ही नेहमीच एका चॉकलेट बॉयच्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

स्वप्नील जोशी हा नेहमीच सिनेमांमध्ये प्रेमळ स्वरूपाच्या भूमिका करत असताना आपण पहिले असेल मात्र स्वप्नील  जोशी आता त्याची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न तयारीत असल्याच कळतंय. स्वप्नील जोशी सध्या वेगळ्याच अभिनयाच्या धाटणीचा रोल  शोधण्याच्या तयारीत आहे. 

मराठी सिनेमासृष्टीतील आपल्या प्रेमळ प्रतिमेला छेद देण्यासाठी स्वप्नील जोशीने नुकताच "मोगरा फुलला" हा सिनेमा केला. या सिनेमामध्ये त्याची भूमिका ही वेगळ्याच धाटणीचीहोती त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता पुन्हा एकदा स्वप्नील जोशी आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. तो लवकरच एका मराठी वेब सिरीजमध्ये पदार्पण करणार असल्याचं वृत्त आहे..

मराठी कलाविश्वात आघाडीचे असे दिग्दर्शक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सतीश राजवाडे हे सध्या लवकरच "समांतर" ह्या वेब सिरींजची निर्मिती करणार आहे. या वेब सिरीजमध्ये स्वप्नील जोशी हा आपलं नशीब अजमावणार आहे. स्वप्नील बरोबर अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही त्याच्याबरोबर सहकलाकाराच्या भूमिकेत असणार आहे त्यामुळे स्वप्नील जोशीच्या अभिनयाची नवीन शैली ही त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News