सुशांतची विधवा पत्नी असल्याचा दिखावा करते आणि दुसरीकडे...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत.
  • आता सीबीआय तपास करत आहे तर त्यात अनेक व्यक्तितीची नावे देखील पुढे येत आहेत.

मुंबई :-  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आता सीबीआय तपास करत आहे तर त्यात अनेक व्यक्तितीची नावे देखील पुढे येत आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने तिच्या आरोपांवर केलेला खुलासे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियाने सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय या मुलाखतीत तिने सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेवरही निशाणा साधला होता.

गेल्या चार वर्षांपासून सुशांत आणि अंकिता संपर्कात नव्हते,  असे असताना अंकिता अचानक त्याच्याबद्दल का बोलतेय, असा प्रश्न रियाने उपस्थित केला आहे. रिया म्हणाली की, सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याची विधवा बनल्याचे ढोंग करते जिथे ती स्वतः दुसऱ्यासोबत साखरपुडा करून बसली आहे. अंकिता देखील अनेक खोट्या अफवा पसरवते आहे.  सुशांतच्या घरात राहून तिने कोणत्या घराचे कागदपत्रे दाखवले आहेत, असे म्हणत तिने तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच माझ्यावर सुशांतच्या पैशांवर ताबा मिळवण्याचे आरोप केले जात आहेत,  तसे असते तर सुशांत अजूनही अंकिता राहत असेलल्या घराचे हफ्ते भरत होता, ते पहिल्यांदा थांबवले असते. अंकिताने सुशांतवर प्रेम केले होते, मी देखील त्याच्यावर प्रेम केले, या परिस्थितीत तिने माझे दु:ख समजून घ्यायला हवे होते, असे देखील रियाने म्हटले आहे.

परंतु, रियाने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. तिच्यावर लावलेले अनेक आरोपही तिने फेटाळून लावले आहेत. अनेक नव्या गोष्टी तिने सांगितल्या आहेत.

'मला सुशांतकडून बाळ हवं होतं'

या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने सांगितले की, 'आम्ही दोघांनी एकमेकांना वचन दिलं होत की, आयुष्यभर एकमेकांना साथ देतील. मला सुशांत सिंह राजपूतकडून एक बाळ हवे होत जे हुबेहुब त्याच्यासारखे दिसले असते. मी त्याला लिटील सुशी म्हणून हाक मारणार होते. तो पूर्णपणे सुशांतसारखा दिसला असता. आम्ही नेहमीच एका कपलसारखे बोलत होतो. आमची मैत्री प्रेमात कधी बदलली कळलंच नाही'. पुढे रियाने सांगितले की, 'मला चांगल्याप्रकारे आठवते की, आमची भेट कशी झाली होती. सर्वात आधी सुशांतनेच मला प्रपोज केल होत. माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकांमध्ये सुशांत सिंह राजपूत सर्वात इमानदार होता. सुशांतचे आणि त्याच्या वडिलांचे नात ठिक नव्हते. त्यामुळे सुशांत नेहमीच चिंतेत राहत होता'.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News