सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुशांतच्या वडिलांची बिहार सरकारकडे सीबीआय चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020
  • सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबई येथील त्याच्या राहत्याघरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.  
  • सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु असतानाच सुशांतच्या कुटुंबियांनी बिहार राज्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करून, रिया हीच सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं म्हंटले आहे.

बिहार :- सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी मुंबई येथील त्याच्या राहत्याघरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.  सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरु असतानाच सुशांतच्या कुटुंबियांनी बिहार राज्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल करून, रिया हीच सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचं म्हंटले आहे. रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या कुटुंबाकडून मुंबई पोलिसांच्या ह्या प्रकरणातील तपासाबाद्ल अविश्वास व्यक्त केला जात आहे. 

ताज्या बातमीनुसार सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी बिहार सरकारकडे दिवंगत अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि बीएलपीचे आमदार नीरज बबलू यांनी देखील बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची विनंती केली आहे. नीरज बबलू यांनी बिहारच्या डीजीपीं वरती निशाणा साधत बिहारचे डीजीपी हे फक्त तपासाबद्दल बोलत आहेत परंतु निकाल काही नाही असे म्हंटले आहे.

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी बिहारहून मुंबई येथे आलेल्या अधिकाऱ्याला राज्य सरकारच्या आदेशावरून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याच्या क्वारंटाईनवरून देखील महाराष्ट्र सरकारबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.  यादरम्यान, एएनआयने सांगितलेल्या वृत्तानुसार सोमवारी  मुंबई पोलिस आयुक्त परम बीर सिंग यांनी म्हटले की, बिहार पोलिस त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी करू शकतात की नाही याची तपासणी करण्यासाठी ते कायदेशीर मत घेत आहेत आणि त्यानंतरच बिहार पोलिसांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करू द्यावी कि नाही यासंबंधी निर्णय घेतला जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News