सुशांतसिंगच्या चाहत्यांच सोशल मीडियावर 'अनोख' आंदोलन; कसा मिळतोय प्रतिसाद?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

'रिया चक्रवर्ती बेवफा है!' अशा प्रकारचे वीस रुपयांच्या नोटेवर घोषवाक्या लिहून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यामुळे नोटेवर लिहून सोशल मीडियावर शेअर करण्याची स्पर्धा लागली आहे.

मुंबई : सुशांतसिंग राजपूर आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची मुख्य साक्षीदार अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची कसून चौकशी केली जात आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले. त्यामुळे रियाला मनस्ताप सहन करावा लागला. सुशांतच्या चाहत्यांनी रिया विरोधात सोशल मीडियावर एक अनोखे आंदोलन सुरू केला. 'रिया चक्रवर्ती बेवफा है!' अशा प्रकारचे वीस रुपयांच्या नोटेवर घोषवाक्या लिहून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यामुळे नोटेवर लिहून सोशल मीडियावर शेअर करण्याची स्पर्धा लागली आहे. 

 

अशा प्रकारचे आंदोलन चार वर्षापुर्वी झाले होते. 2016 मध्ये 'सोनम गुप्ता बेवफा है! असे घोषवाक्य दहाच्या नोटेवर लिहून सोशल मीडियामध्ये  व्हायरल करण्यात आले होते. या आंदोलनाला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. गुगलच्या सर्जरीमध्ये या नोटांचा तिसरा क्रमांक आला होता. सुशांत सिंगच्या चाहत्याने रिया चक्रवर्ती बेवफा असल्याचा आरोप केला. सुशांतचे पैसे रियाने खर्च केल्यामुळे नोटेवर नाव लिहून तिच्यावर टीका करण्यात आली. सोशल मीडियावर सध्या आंदोलनाची चर्चा जोरात सुरू आहे. आंदोलनाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आता हे आंदोलन पेटणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाची चौकशी सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, मुंबई पोलीस या तीन विभागाकडून केली जात आहे. त्यामध्ये आणखी एसीबी विभागाची भर पडली आहे. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले. याचा त्रास रियाला होत असल्याचे त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले. मात्र रिया सर्व विभागांच्या चौकशीला उत्तर देण्यास तयार असल्याचे रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. रिया यापूर्वी कधीही अंमली पदार्थाचे सेवन केले नाही, त्यामुळे रिया कोणत्याही चाचणीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे असे मत प्रियाच्या वकिलांनी व्यक्त केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News