सुशांतसिंग आत्महत्याप्रकरणी बॉलीवुडमधील 'हे' प्रसिद्ध सेलिब्रिटी चौकशीच्या फेऱ्यात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 July 2020

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 37 जणांचे जबाब नोंदविलेले आहेत.

अंधेरी: अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 37 जणांचे जबाब नोंदविलेले आहेत. आता अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वक्तव्यानंतर चित्रपट सृष्टीतील काही दिग्गजही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, दिग्दर्शक महेश भट्ट यांना पोलिसांनी समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. निर्माता करण जोहर याच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्यात येणार आहे. आवश्‍यकता असल्यास करण जोहर यालाही समन्स बजावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महेश भट्ट यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याच्या वृत्ताला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

सुशांत सिंग याने नैराश्‍येतून आत्महत्या केल्याचे यापूर्वीच त्याच्यावर उपचार करणाऱ्या तीन डॉक्‍टरांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. मात्र नैराश्‍येच्या कारण काय? याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिने एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक वादग्रस्त विधाने करत चित्रपटसृष्टीत "माफिया संस्कृती' असल्याचे वक्तव्य केले होते. पोलिस त्या दिशेने तपास करत असून महेश भट्ट हे आता चौकशी फेऱ्यात आले आहेत; तर करण जोहर याचीही चौकशी होऊ शकते.
अनिल देशमुख यांनी सांगितले की, महेश भट्ट करण जोहर यांच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्यात येणार आहे. आवश्‍यकता असल्यास करण जोहर यांना समन्स पाठवून चौकशी करण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News