सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे ;  ठाकरे सरकारवर चहू बाजूंनी टीका

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Thursday, 20 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकारणाचा तपास योग्य करत आहे असे गृहमंत्री म्हणाले होते.
  • सीबीआयकडे याचा तपास देणं योग्य नाही.
  • काही राजकीय पक्ष बिहारची निवडणूक समोर ठेवून महाराष्ट्रात राजकारण करत आहेत.

मुंबई :-  मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकारणाचा तपास योग्य करत आहे असे गृहमंत्री म्हणाले होते. सीबीआयकडे याचा तपास देणं योग्य नाही. काही राजकीय पक्ष बिहारची निवडणूक समोर ठेवून महाराष्ट्रात राजकारण करत आहेत. मुंबई पोलीस आणि राज्य सरकार सुशांतला न्याय देण्यास सक्षम आहेत असे गृहमंत्री म्हणाले होते. तरीही हा तपास सीबीआयकडे गेलेला आहे. हे ठाकरे सरकारच अपयश म्हटले जात आहे. कॅबिनेट मधील युवा नेत्यांचे या प्रकरणात नाव येत असून त्यांचे काही महत्वाचे मंत्री मूग गिळून गप्प आहेत. तसेच पार्थ पवार यांनी देखील सीबीआय चौकशी व्हावी यासाठी मागणी केली होती यावरून पवार कुटुंबात वाद असल्याचे समोर आले. सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे तपास दिला आणि गृहमंत्री यांनी स्वतः उच्च स्तरीय बैठक घेतली तसेच मुख्यमंत्री यांच्या भेटीला देखील मुंबई पोलीस आयुक्त पोहचले होते त्यामुळे सर्वत्र चर्चा आहे की, सुशांतच्या प्रकरणात ठाकरे सरकारच अपयश समोर येतंय का? सुशांत सिंगच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार धोक्यात येईल का ? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

 

आज माध्यमांनी सुशांत सिंग राजपूत यांच्या केसचा बाजार केला आहे. काल सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ते त्यांच्या परीने तपास करतील. पण याप्रकरणात मीडियाची भूमिका खूप चुकीची आहे! मुंबई पोलिसांच्या कामावर अविश्वास दाखवणे अयोग्य आहे.  मुंबई पोलीस आहेत म्हणून मुंबईत आपल्या माता बहिणी रात्रीच्या वेळी मुक्तपणे फिरू शकतात. बिहार पोलिसांनी आपल्या कामाकडे जास्त लक्ष द्यावे. भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणारे गुप्तेश्र्वर पांडेय आज बिहारचे डीजीपी आहेत आणि ते मुंबई पोलिसांवर आरोप करत आहेत. कोरोनाने सगळ्यांना हरवल पण राजकारणाला हरवू शकला नाही हे खरं आहे. सत्ताधाऱ्यांवर आरोप करायचे म्हणून महाराष्ट्रातील विरोधीपक्ष पार खालच्या पातळीवर पोहचले आहे. सीबीआयकडे प्रकरण गेलं म्हणजे लगेच न्याय मिळालाच असे होत नाही. कितीतरी हजार केसेस सीबीआयकडे पेंडींग आहेत. खरा सोक्षमोक्ष सीबीआयने लवकर लावावा अशी माझीही इच्छा आहे. पण बिहार निवडणुका झाल्यावर सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्याच केली होती, असा निष्कर्ष नको निघायला. सुशांत तर बिचारा गेला. पण मीडियाने त्याच्या मृत्यूचा बाजार मांडला आहे. देशात अनेक समस्या आहेत आणि त्या भविष्यात अधिक निर्माण होणार आहेत. केंद्रसरकार किंवा राज्यसरकार रोजगारासाठी काहीच करत नाही. लोक कोरोना आजाराने कमी आणि उपासमारीने अधिक मरू लागले आहेत. यावर लक्ष देण्यापेक्षा भारतीय मीडिया सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येला कितीतरी महत्त्व देत आहेत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर जनमत तयार करणे मीडियाने थांबवून देशातील खरे वास्तव मांडव सांगाव.

-अमित गायकवाड

सुशांत सिंगच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार धोक्यात येईल की, नाही हे मी ठाम पणे सांगू शकत नाही. पण हा आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यामुळे खरी सत्यत्या जगासमोर येईल अशी आशा नक्की बाळगते.

- श्रद्धा ठोंबरे

सुशांत सिंग आत्महत्या तपास भले ही सीबीआयकडे जाऊद्या पण आपले महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. ह्यात तपास करण्यासाठी हा एक राजकीय डावपेच आहे अभिनेता आत्महत्याचा. आपला शेतकरी आत्महत्या करु देत,  पावसात मरुदे,  राजकारणी नेते त्याला मारुदे हे मुद्दा कोणी घेते का अंगावर. आज एक अभिनेता गेला तर काय आपला नुकसान झाले का? फक्त त्याचे चित्रपट पहायचे बंद होणार एवढेच.

आपला शेतकरी बाप जाऊदे मग कोण येते का आपले अश्रू पुसायला. भलेही तपास कोणाकडे पण जाऊदे हा सगळा राजकीय कट आहे आणि ह्याला एक वेगळे वळण द्याचे एवढेच कारण आहे. आज कोरोनामुळे लाखो लोक रस्त्यावर आलेत त्यांचे कोणी हाल विचारले का सांगा मला. रायगड मध्ये चक्रीवादळ मुळे कितीतरी घरे, संसार उध्वस्त झाली कोणी केली का मदत ? आणि हा तपासनुसार सगळे सत्य बाहेर येईल हे साहजिकच आहे. पण गेली १ महिने नुसता चक्रे फिरत आहेत हे कोणाच्या लक्षात आले की नाही.

हे सरकार ना जो निर्णय घायचा आज तो बाजूला ठेऊन जे नको आहे त्याचा विषय डोक्यावर घेऊन गाजावाजा करत आहे. कुठे गेले मराठा आरक्षण,  कुठे गेली सरकार मदत ज्यांनी आपल्या देशाला बलिदान दिले त्यांचे, कुठे आहे सरकारी योजना,  कुठे आहे गोरगरीब लोकांना मदत करणारे लोक सांगा?

-सागर सातवेकर

मला हे माहीत आहे की, सुशांतची आत्महत्या झाली हे काही तरी कारण असू शकत किंवा त्या पाठी माघे कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे किंवा कोणत्या हिरोचा हात आहे हे आणखी सिद्ध झालं नाही. पण मला वाटत की, खरंच आपली महाराष्ट्र पोलीस हा तपास करू शकत नाही का ?  तर का करू शकत नाही आज पर्यंत ज्या ज्या वेळेस मोठा हल्ला झाला. त्या त्या वेळेस आपले पोलीसच मदतीतस आले. २६/११ च्या वेळेस कोण सीबीआय  मदतीला आली का नाही ना मंग करू द्या ना चौकशी पोलिसांना जर अश्या वेळेस पोलीसांना एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू देत नाही तर काही जणांचा असा समज होईल की, आपलेच पोलीस गुन्हाची चौकशी करण्यास असमर्थ आहे.

जर ह्या मागे कोणत्या नेत्याचा हात असेल तर त्याला गुन्हा हा होणारच आहे. ज्या वेळेस निर्भया, कोपर्डी, खैरलांजी तसेच हैदराबाद यासारख्या घटना होतात ह्यांची चौकशी व्हायला हवी तर ह्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही परंतु ह्याकडे लक्ष देऊन जो गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुन्हा झाला पाहिजे आणि आपल्या भगिणीला न्याय मिळाला पाहिजे. माझ अस म्हण आहे की, कायद्या समोर कोणताच व्यक्ती मोठा नाही जर त्यांनी गुन्हा केला आहे तर त्याला शिक्षा ही व्हयलाच हवी...

-महेश सोरटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News