'यूजीसी'च्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेसह ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षासक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांची आता परीक्षा घेणं योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने परीक्षा रद्द करण्यात याव्यात असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे.

'यूजीसी'च्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

कोरोनाच्या काळात परीक्षांचा मुद्दा अधिक गाजला आणि अखेरीस न्यायालयात गेला. अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे की नाही, या संभ्रमावस्थेत आजही पालक आणि विद्यार्थी आहेत. आज सुप्रीम कोर्टात परीक्षा होणार आहे की नाही या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात या भूमिकेवर ठाम आहे.

यूजीसीने कोरोनाची परिस्थिती पाहून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. परंतु दिल्ली, महाराष्ट्र, आसामसह १३ राज्यांनी कोरोनाच्या काळात परीक्षा घेण्यास नकार दिला. पण विद्यापीठ अनुदान आयोग परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. देशातील ६४० विद्यापीठांपैकी ४५४ विद्यापीठांनी परीक्षा घेतल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितले.

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेसह ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षासक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांची आता परीक्षा घेणं योग्य नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने परीक्षा रद्द करण्यात याव्यात असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे.

गुरूवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचं आरोग्य संभाळत अंतीम वर्षाच्या परीक्षा घेण्याचं युजीसीचं उद्दीष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर झाल्यातर पुढीलवर्षाच्या अभ्यासाला उशीर होणार नाही. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी असं युजीसीने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News