विद्यार्थ्यांसाठी देशात 'सुपर ३०' मॉडेल राबवले जाणार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020
  • 1 रुपयात विद्यार्थ्यांना मिळणार IIT, JEE चे धडे; आनंद कुमार यांचा पुढाकार

नवी दिल्ली :  गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला 'सुपर ३०' चित्रपटातून प्रकाश ज्योतात आलेला गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फक्त एका रुपयात आयआयटी आणि जेईईचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे. कॉमन सर्विससेंटर सिएसईच्या ई- गव्हर्नन्स सर्विसच्या मदतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

कॉमन सर्विस सेंटर सिएसईच्या मदतीने विविध शहरात प्रशिक्षण वर्ग राबवले जाणार आहेत. याच माध्यमातून आयआयटी आणि जेईईच्या पूर्व परीक्षांचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. 'सुपर ३०' कोचिंग फेम आनंद कुमार हे विशेष मॉडेल तयार करणार आहेत. ज्यामध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना धडे दिले जातील.  या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान याविषयात रुची निर्माण करण्यास मदत होईल असे आनंद कुमार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यांनी नुकतेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आनंद कुमार हे एक उत्तम गणिततज्ज्ञ असून सोप्या पद्धतीने गणित शिकवण्यात त्यांचा हाथखंड आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News