सुनिधी म्हणते, ‘मला मराठी गाणी गायला आवडतात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 January 2020

नुकताच या चित्रपटाचा संगीत आणि ट्रेलर लाँच सोहळा सुनिधीच्या हस्ते पार पडला. या वेळी मराठी गाण्यांप्रती असणारं प्रेम तिने व्यक्त केलं. सुनिधी म्हणते, ‘मला मराठी गाणी गायला प्रचंड आवडतात.

बॉलीवूडला सुपरहिट गाणी देणारी गायिका सुनिधी चौहानने प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला लावले. आता तिला मराठी गाण्यांची ओढ लागली आहे. भावेश पाटील दिग्दर्शित ‘रहस्य’ चित्रपटाचे टायटल साँग तिने गायले आहे.

नुकताच या चित्रपटाचा संगीत आणि ट्रेलर लाँच सोहळा सुनिधीच्या हस्ते पार पडला. या वेळी मराठी गाण्यांप्रती असणारं प्रेम तिने व्यक्त केलं. सुनिधी म्हणते, ‘मला मराठी गाणी गायला प्रचंड आवडतात. या चित्रपटामधील गाणं गातानाही खूप मजा आली.’

या चित्रपटाचे ‘कसले हे रहस्य’ हे टायटल साँग सुनिधीनं गायलं आहे. इतर गाणी आदर्श शिंदे, प्रेम कोतवाल, यामिनी चव्हाण यांनी गायली आहेत. भावेश प्रॉडक्‍शन्स निर्मित या चित्रपटात लकी बडगुजर, राकेश बागुल, स्वाती पाटील आदी नवोदित कलाकार काम करताना दिसणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News