उष:काल

शुभांगी पवार 
Monday, 9 September 2019

उष:कालाची वाट पाहूनी,
निशा गेली  क्षितिजापार.
जणू सांगून गेली ती,
या मानवी जीवनाचे सार!

उष:कालाची वाट पाहूनी,
निशा गेली  क्षितिजापार.
जणू सांगून गेली ती,
या मानवी जीवनाचे सार!

रात्र-दिवस म्हणजे जणू,
असती सुख-दुःखासारखे.
उदासीन बनुनी उगाच,
का व्हावे सुखाला पारखे!

उष:काल येई नेहमीच,
नवचैतन्याची नवं पहाट घेऊन.
सकारात्मक ऊर्जेचे नवतम,
सोनसळी वसने जणू लेवून!

उष:काल सांगे मानवास,
जगावे नेहमीच खंबीरपणे.
जे हातून निसटून गेले,
कवटाळू नये ते गंभीरपणे!

 

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News