आला उन्हाळा...स्वत:ला सांभाळा; उन्हाळ्यात कशी घ्याल काळजी ?

हर्षल भदाणे पाटील
Sunday, 24 March 2019

होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. उन्हामुळे आणि घामाने सर्वच हैराण झालेले असतात. उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन येत असतो. अशात आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक असतं.

होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. उन्हामुळे आणि घामाने सर्वच हैराण झालेले असतात. उन्हाचे चटके आणि घामासोबतच उन्हाळा काही रोगांनाही सोबत घेऊन येत असतो. अशात आरोग्याची काळजी घेणं खूप आवश्यक असतं.

उन्हाळ्यात कसे जपाल स्वत:ला?

 या दिवसांत भरपूर पाणी प्यावं. दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पोटात जायला हवं.

केवळ पाणी नाही तर लिंबू सरबत, नारळाचं पाणी, इलेक्ट्रॉल, वाळ्याचं किंवा कोकमाचं सरबतही सतत घ्यावं. पाण्यासोबत मीठ आणि साखरही पोटात जाण्याची आवश्यकता असते आणि या पेयांमधून ती गरज पूर्ण होते. कलिंगड, अननस अशा पाणीदार फळांचादेखील आहारात मोठ्या प्रमाणात समावेश करावा.

 उन्हात फिरणं शक्यतो टाळा. अगदीच फिरायचं झालं तर डोक्यावर टोपी (कॉटनची आणि पेस्टल शेडची) घालायला किंवा छत्री घ्यायला विसरू नका. तसंच ओला रुमालही अधून मधून तापलेल्या डोक्यावर ठेवावा.
 

 या दिवसांत गडद रंगांचे कपड्यांऐवजी कॉटनचे आणि हलक्या रंगांचे कपडे वापरा.

 डांबरी रस्त्यावर चालताना पायात रबरी चपला घालू नयेत.

 उन्हाळ्यात सूर्यकिरणं प्रखर असतात. अशा प्रखर सूर्यकिरणांचा त्वचेशी थेट संपर्क झाल्यास त्वचा काळवंडते, टॅन होते. म्हणून उन्हात जाताना मान, हात संपूर्णपणे झाका. सनस्क्रीन लावायला विसरू नका, गॉगल घाला. यामुळे सनस्ट्रोकपासून बचाव होईल.

 या काळात तिखट पदार्थ खाणं टाळा. जेवण बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचा वापर प्रकर्षाने टाळावा. तसंच अतिमसालेदार चमचमीत पदार्थ खाऊ नयेत. अती आंबट पदार्थही र्वज्य करावेत.
 

उन्हातून आल्यावर थेट एसीमध्ये बसू नये.

 उन्हातून आल्यावर लगेच अतिथंड पाणी, आइस्क्रीम खाऊ नये. शरीराचं तापमान आधी नॉर्मलवर यायला द्यावं.

 झोपताना लहान मुलांच्या टाळूवर थोडं साजूक तूप चोळावं. तसंच लहानांना आणि मोठ्यांनाही झोपायच्या वेळी पायाच्या तळव्याला साजूक तुपाने हलका मसाज करावा. त्यामुळे उष्णता बाहेर पडायला मदत होते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News