सुला वाईन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

मुंबईतील रेटारेटी आणि धावपळीमुळे आपल्याला नेहमीच शहरात विकेंड साजरा करण्याच्या अनुभवापासून दूर कुठेतरी निवांत जागी विकेंड साजरा करण्याची इच्छा होत असते.

मुंबईतील रेटारेटी आणि धावपळीमुळे आपल्याला नेहमीच शहरात विकेंड साजरा करण्याच्या अनुभवापासून दूर कुठेतरी निवांत जागी विकेंड साजरा करण्याची इच्छा होत असते. त्यामुळे, आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर जायचे असेल किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर मुंबईजवळील सहलीच्या 10 आवडत्या ठिकाणांची आमची यादी आपला निश्चितच अपेक्षाभंग करणार नाही.

सुला वाईनयार्ड्स: एक दिवस वाईन व सूर्यप्रकाशाच्या सहवासात
मुंबईपासून सुमारे 230 किमी अंतरावरच्या या द्राक्षांच्या मळ्यांमध्ये आपण झोकात निवांत होऊन टवटवीत होऊ शकता. मग आपल्याला संपूर्ण वाईनयार्ड व वायनरीच्या सहलीसोबत ग्रेप-टू-ग्लासचा अनुभव घ्यायचा असेल किंवा सुला बियाँड या विलक्षण इन-हाउस व्हिलामध्ये निवास करायचा असेल तर सुला वाईनयार्ड एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा तेथे थांबून विकेंड साजरा करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.

इथल्या सर्ववेळ सुरू असणाऱ्या कॅफे रोज या रेस्टॉरंटमध्ये जेवण करा, स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त विहार करा किंवा गावातल्या रस्त्यांवर सायकलने फेरफटका मारा.सुला वाईनयार्डकडे जात असताना वळसा घेऊन आपण वैतरणा धरणालाही जाऊ शकता ज्याला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते जे वैतरणा नदीवर बांधलेले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे स्थित आहे व आपल्या सुंदर सरोवर आणि नयनरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News