सुजान पालकत्व काळाची गरज : सुनंदाताई पवार 

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Monday, 18 May 2020

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. रविवारी (ता.17) फेसबुक लाईव्हद्वारे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'महिलांच्या स्वावलंबनातून आर्थिक विकास' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. 

2 लाख 25 हजार तरुणींशी चर्चा केल्यानंतर तरुणींच्या विविध समस्या समोर आल्या. मासिक पाळीविषयी तरुणींमध्ये खुप अज्ञान आहे. आईने मुलींना मासिक पाळी विषयी सविस्तर माहिती दिली पाहीजे मात्र आपल्याकडे असे होत नाही. शिक्षकांना मासिक पाळीची माहिती देण्यास संकोच वाटतो त्यामुळे शाळांमधून सुद्धा मासिक पाळीविषयी माहिती दिली जात नाही. मात्रृत्व हे निसर्गाने महिलांना दिले आहे मात्र, पालकत्व हे विकसीत करावे लागते त्यामुळे सुजान पालकत्व काळाची गरज आहे असे मत सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.

 

तरुणाईच्या हक्काचं व्यासपीठ 'यिनबझ'वर मान्यवरांच्या खास मुलाखती घेण्यात येत आहेत. रविवारी (ता.17) फेसबुक लाईव्हद्वारे अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांची मुलाखत घेण्यात आली. त्यांनी 'महिलांच्या स्वावलंबनातून आर्थिक विकास' या विषयावर तरुणाईशी संवाद साधला. शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. 

कुटुबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ग्रामीण भागातील महिला मजुरीला जातात मात्र, त्या मजुरीच्या पैशावर महिलांचा अधिकार नसतो. त्यामुळे महिलांना दुसऱ्यांवर अवलंबुन रहावे लागते. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य दिले पाहीजे, त्याच बरोबर आरोग्य, शिक्षण आणि काम या तीन गोष्टी महिलांना मिळाल्या पाहीजे. तसेच महिलांना सन्मान दिला गेला पाहीजे असे सुनंदाताई पवार यांनी सांगितले.

अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट

शेतकरी, शेतीवर आधारीत उद्योग, कामगार, मजूर यांच्या सर्वांगीन विकासासाठी 55 वर्षापुर्वी कै. अप्पासाहेब पवार यांनी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची पायाभरणी केली.  आणि आदरणीय शरद पवार यांनी ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून जनतेच्या सेवेसाठी हे ट्रस्ट अहोरात्र काम करत आहे. शिक्षणात तरुणींच प्रमाण कमी आहे. ते वाढल पाहीजे असा अप्पासाहेबांचा आग्रह होता. त्यामुळे आम्ही 35 वर्षापुर्वी  शिक्षणाच रोपट लावलं, त्याच आज वटवृक्षात रुपांतर झाल. आज 7 हजार तरुणी शिक्षण घेत आहेत. 4 हजार मुली वसतिगृहात राहतात. आर्थिक दृष्या प्रतिकुल परिस्थितीत असणाऱ्या तरुणींचे पालकत्व ट्रस्ट घेत आहे. 'भविष्यात पाण्याची कमरता देशाला भेडसावणार आहे. पाण्यावर वेळीत उपाय केला नाही तर देशात मोठी समस्या निर्माण होईल' असे अप्पासाहेब सांगायचे. अप्पासाहेबांच भाकीत खर ठरलं. आज पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आम्ही 'पाणी आडवा. पाणी जीरवा', 'चला गाव समृद्ध करुया' आदी उपक्रम राबवले. उपक्रमातून अनेक गावे समृद्ध झाली.  

महिला सक्षमीकरण

महिलांना सक्षम होण्यासाठी स्वांवलंबी होणे गरजेचे आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही बचत गट निर्माण केले, बचत गटांच्या माध्यमातून खाद्य पदार्थ, विविध वस्तू तयार केल्या जातात. तयार केलेला माल विक्रीसाठी पुण्यात 'व्यंकटी जत्रा' नावाच प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असतो. 15 वर्षात 3 लाख महिलांना आपले उत्पादन विक्रीची संधी 'व्यंकटी जत्रेने' दिली. सध्या 380 महिला स्वत:चा स्वतंत्र्य व्यवसाय करत आहेत. ग्राहक आणि उद्योजक यांच्या दुवा होण्याच काम व्यंकटी जत्रा करत आहे. 

गाव तेथे महिला व्यवसाय

प्रत्येक गावात व्यवसाय उभा राहिला पाहीजे या दृष्टीकोणातून 'गाव तेथे महिला व्यवसाय' उपक्रम सुरु करण्यात आला. गावातील महिलांना एकत्र करुन त्यांना प्रशिक्षण दिले जाते. उद्योगासाठी अर्थ सहाय्य दिले जाते. सध्या 50 गावात हा उपक्रम सुरु आहे आणि भविष्यात याची व्याप्ती वाढविण्याचा विचार आहे. यातून महिला सक्षम होतील.

महिला आरोग्य शिबिर

महिलांना सक्षम करायच असेल तर महिलांनी निरोगी असले पाहीजे. दर तीन महिन्याला महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करुन त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. कर्क रोगाची तपासणी आणि पोषक अन्न यावर अधिक भर दिला जातो. महिलांमध्ये मासिक पाळी विषयी जनजागृतीचे काम सुरु आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News