या टीव्ही कलाकाराने केली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

कुशलने अखेरचं काम इश्क में मरजावां या सिरिअलमध्ये काम केलं होतं. त्याने एका युरोपियन मुलीशी लग्न केल असून त्याला 2016मध्ये एक मुलगाही झाला आहे. त्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, सलाम ए इश्क अशा अनेक फेमस चित्रपटांत काम केलं आहे.

मुंबई : टीव्ही सिरिअल विश्वातील प्रसिद्ध चेहरा असलेल्या कुशल पंजाबी याचा 37 व्या वर्षी धक्कादायक मृत्यू झाला आहे. त्याने आत्महत्या केली असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या घरातच आढळून आला.

कुशलच्या आत्महत्येच्या बातमीला त्याचे मित्र करणवीर बोहरा, चेतन हंसराज यांनी दुजोरा आहे. त्याच्या निधनाचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही. मात्र, अभिनेता करणवीर बोहराने सोशल मीडियावर त्याच्या निधनाची बातमी शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे. 
त्याने कुशलचा फोटो शेअर करत लिहिले आहे, ''तुझ्या निधनाच्या वृत्ताने मला खूप मोठी धक्का बसला आहे. मला अजूनही यावर विश्वास बसत नाही.

मला खात्री आहे तु जिथे कोठे असशील, खूप खुश असशील. तु ज्याप्रकारे तुझं आयुष्य जगलं आहे त्याने मी खूप प्रेरित झाले आहे. तुझा डान्स, तुझी तंदुरुस्ती, तुला असलेलं बाईक्सचं वेड, तुझं बाबापण, तुझा नेहमी हसरा चेहरा आणि तसाच स्वभाव हे सर्व मला खूप प्रेरित करतं. मला तुझी खूप आठवण येईल.''

कुशलने अखेरचं काम इश्क में मरजावां या सिरिअलमध्ये काम केलं होतं. त्याने एका युरोपियन मुलीशी लग्न केल असून त्याला 2016मध्ये एक मुलगाही झाला आहे. त्याने लक्ष्य, काल, धन धना धन गोल, सलाम ए इश्क अशा अनेक फेमस चित्रपटांत काम केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News