नोकरी गेल्याने २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

नोकरी गेल्याने २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

नोकरी गेल्याने २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या 

कोरोनाच्या काळात अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कारण महिन्यात असलेली नोकरी नाहीशी झाली आणि मिळेल तो रोजगार नागरिक करू लागल्याचे चित्र संपुर्ण देशात पाहायवयास मिळतं आहे. कोरोनाच्या काळात नोकरी गेल्याने पुण्यातील एका २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मृत्यूपुर्वी तिने एक चिट्टी लिहीली असून मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर चिट्टीत लिहिला आहे. 

मृत तरूणीचे नाव कोमल महादेव बांधल असं असून ती पुण्यातील धायरी येथे कुटुंबियांसोबत राहत होती. कोमलने बारावीपर्यंतचं शिक्षण केलं होतं. त्यानंतर तिने एका ठिकाणी नोकरी करण्यास सुरूवात केली. पण लॉकडाउन सुरू झालं आणि तिची नोकरी गेली. वडिल आणि भाऊ तेथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. तरूणीने आत्महत्या केल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. 

कोमलने इतकं टोकाचं पाऊल उचललं, आणि आत्महत्येला कोणीच जबाबदार नाही असं लिहिल्यानं पोलिसांचा संशय वाढला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. परंतु तिच्या कुटुंबाची सुध्दा कसून चौकशी सुरू आहे. कारण तिचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं. ताणतणावात ती होती का ? तिचं कोणाशी भांडणं वगैरे झालं होतं का ? या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या जाणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News