सुधीर फडकेंच्या कारकिर्दीला असा उजाळा 

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 21 February 2019

शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके अर्थात बाबूजींचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना स्टार प्रवाह या वाहिनीतर्फे अनोखी स्वरांजली वाहण्यात आली.

मुंबई : रवींद्र नाट्य मंदिरात नुकत्याच झालेल्या ‘आनंदयात्री’ कार्यक्रमात अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. १० मार्चला हा कार्यक्रम स्टार प्रवाह या वाहिनीवर दाखविला जाणार आहे.

सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांनी ‘आनंदयात्री’च्या पर्वाची सुरुवात झाली. अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी बाबूजींची गाणी नेमकी कशी जन्माला आली? या गाण्यांच्या निर्मितीमागे काय प्रेरणा होती?

याचा लेखाजोखा ‘आनंदयात्री’ या कार्यक्रमातून घेण्यात आला. या वेळी बाबूजींच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News