चिपळूण मधील असा हा अदभुत किल्ला

सदफ कडवेकर
Tuesday, 30 April 2019

2 फूट उंच व 4 फूट रूंदीच्या गुहेतून 20 फूट लांब फक्त सरपटत जायचे आहे.गुहेच्या पुढच्या स्थितीचा अंदाज करणे कठीणच आहे. पुढे 90° चे वळण आहे.सरपटल्यानंतर बसण्यासारखी जागा मिळाली खरी पण तिथे पोटरीपर्यंत चिखल आहे. उभे रहायची तीव्र इच्छा आहे पण उभे राहता येत नाहीये.फार फार तर वाकू शकतो. हातात बॅटरी,मेणबत्ती,कॅमेरा आहे. संतुलन कसे करायचे..?

90° वळणाच्या पुढे फक्त 3 फूट उंचीच्या भिंतीला पाठ टेकवून कसंतरी सावरायचं आहे स्वतःला.अवस्था इतकी वाईट की घाम पुसणेही अवघड झाले आहे. स्वतःच्याच श्वासाचा आवाज Bass वाजवल्यासारखा ऐकू येत आहे, त्यामुळे गुहेत कुणीतरी असल्याचा सारखा भास छातीत धडकी भरवत आहे.

त्यात वटवाघळांची बाहेर पडण्यासाठीची गडबड, पण त्यांनाही बाहेर जायला जागा नसल्याने तोंडासमोर येऊन त्यांचे मागे वळणे हे अतिशय भितीदायक. पूर्णपणे 90 अंशावरील वळणांमुळे पुढच्या वळणावर काय असेल हे बघणे अतिशय अवघड. मनात इतके भयानक विचार आहेत की हृदयाच्या ठोके छाती फोडून बाहेर येणारच आहेत इतकी भिती.

आणि टॉर्च विझली..

तरीसुद्धा 96×96 से.मी. चे अगदी पद्धतशीर कोरीव काम, लांबसडक गुहेचा थरार, ज्यांनी हि गुहा खोदण्यासाठी परिश्रम घेतले त्यांचा आदर, ज्या राजाच्या डोक्यात कल्पना आली त्या राजाला नमन,ज्या जंगलाने आणि तेथील वन्यजीवांनी लोकांना गुहेत शिरण्यापासून थांबवण्यासाठी निर्माण केलेली भिती, या सर्व गोष्टींना माझा सलाम.!

आयुष्यातील काही अनुभव असे असतात जे त्याक्षणी संपूर्ण शरीरात भूकंप निर्माण करणारे असतात. पण नंतर इतका आनंद देतात जो आपण पैशाने विकत नाही घेऊ शकत. ज्यांनी माझ्यासोबत या गुहेत शिरण्यास मदत केली माझ्या त्या मित्रांचे आभार.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News