ऐसी वारी पंढ़रीची, निघाली निघाली...

सागर संजय बारटक्के
Saturday, 13 July 2019

तु ध्यानी मनी जग स्मरते अंतरी
वैष्णवांचा सखा जगाचा कैवारी
भक्त हरखती तुझी थोरवी गाती
म्हणे जीवनी तु माझा सांगाती
ऐसा जगदोद्धरी तु विठुमाउली

तु ध्यानी मनी जग स्मरते अंतरी
वैष्णवांचा सखा जगाचा कैवारी
भक्त हरखती तुझी थोरवी गाती
म्हणे जीवनी तु माझा सांगाती
ऐसा जगदोद्धरी तु विठुमाउली
नामघोषात कुंभार गोरा लेक तुडवि पायदळी
उधळूनि प्रपंच अन चालल्या वारकरी पखाली
ऐसी वारी तुझी पंढ़रीची  निघाली निघाली ।।१।।

कैसी भोळी भक्ती ही या वेड्या भक्ताची
लेकीस तो  विसरला घडली चूक बापाची
वाजे टाळ मृदंग त्याचा आवाज कानी
डोळे झाकलेले त्यास नाही दिसलि तान्ही
किती साद घाली बापा लेक आसवात न्हाली
ऐसी वारी तुझी पंढ़रीची निघाली निघाली ।।२।।

बाप झालासे संत  चाले वाट पंढ़रीची
त्यास नाही उसंत/ तमा त्या उपवर मुलीचि
घेतला लचका जगान स्त्रीत्वाचा   ऐसा
हरला मान तिचा कोसळती अश्रुधारा
नाही तमा बापासि  दिसे फक्त ती माउली
उदरी जन्म घेई आता पापाची सावली
 लेकिच्या सुखसंसाराची नाव चंद्रभागेत बुड़ाली 
ऐसी वारी तुझी पंढ़रीची  निघाली निघाली ।।३।।

मने दोन जुळणार होती प्रेमरंगात न्यारी
बाटलेली काया तरीही सख्याचि तयारी
परि जगण्याची इच्छा ना उराशि राहिली
मनस्थिति सख्याची या वेड़ात भिजली
ना आठवण बापासि झाली भक्ति नशाचि 
सुख हाताशि असुनि ना त्यास पर्वा कशाचि
दुःखाच्या शेवटी संसाराचि अंत्ययात्रा निघाली
ऐसी वारी तुझी पंढ़रीची वारी निघाली निघाली ।।४।।
उधळूनि प्रपंच अन चालल्या वारकरी पखाली
ऐसी वारी तुझी पंढ़रीची निघाली निघाली....।।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News