अशा पदध्तीत करा हेअर सिरम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019
  • केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हेअर सिरम वापरण्याचा सल्ला दिला जातो. 
  • पोचेल. हा उपाय नियमित केल्यास चांगला फरक पडतो.
  •  ३० मिनिटांनंतर केस धुतल्यास केसांचे पोषण होते.

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हेअर सिरम वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारातून हेअर सिरम विकत आणण्यापेक्षा केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरच्या घरी हेअर ग्रोथ सिरम तयार करू शकता. 
तुमच्या डोक्‍याची व केसांची त्वचा कोरडी असल्यास बदामाचे तेल, ऑर्गन तेल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून हेअर सिरम तयार करू शकता. हे सर्व योग्य प्रमाणात एकत्र करून केसांच्या मुळांना मसाज करून गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवून केसांना वाफ देण्यासाठी लावावा. यामुळे सिरम केसांच्या मुळापर्यंत पोचेल. हा उपाय नियमित केल्यास चांगला फरक पडतो.

तुमच्या डोक्‍याची त्वचा व केस ऑइली असल्यास दोन चमचे ॲलोवेरा जेल, एक चमचा बेकिंग सोडा व दोन चमचे गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट केसांच्या मुळाशी मसाज करून लावावी. दहा मिनिटांनी केस धुवून टाकावे. मध आणि बदमाचे तेल एकत्र करून ते केसांना लावून ३० मिनिटांनंतर केस धुतल्यास केसांचे पोषण होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News