मुरुमांवर अशी पथ्ये पाळणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 September 2019
  • त्यामुळे यावर योग्य वेळेस तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उपचार करणे गरजेचे आहे.

आपण मागील भागात मुरूम, पुटकुळ्या असलेल्या व्यक्तींनी पाळावयाची काही पथ्ये पाहिली. ही पथ्ये पाळल्यास तसेच आवश्यक काळजी घेतल्यास मुरम व पुटकुळ्यांचा त्रास लवकर आटोक्यात येतो. आज आणखी काही पथ्ये पाहूयात.
१) केसातील कोंड्यावर उपचार करावेत. 
२) केसांना तेल लावणे टाळावे. 
३) आहारात दुग्धजन्य व पिष्टमय पदार्थ टाळावेत. 
४) वॅक्‍सिंग टाळावे. 
५) पाठीवर, दंडावर व छातीवर फोड असतील तर सैलसर, सुती कपडे वापरावेत. 
६) काही विशिष्ट प्रकारचे औषधी फेसवॉश उपलब्ध आहेत. वैद्यकीय सल्ल्याने त्याचा वापर करावा. 
७)  व्यायाम करून वजन आटोक्‍यात ठेवणे. 
मुरुमांवर आता प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. पोटात घेण्याच्या व लावण्याच्या औषधांबरोबरच केमिकल पिल्स, लेझर उपचार, प्लेटलेटचे इंजेक्‍शन, फिलर्स अशा आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहेत. शरीराच्या दर्शनी भागावर व मुख्यत्वे चेहऱ्यावर उठणाऱ्या पुटकुळ्यांमुळे सौंदर्यात बाधा येते. बऱ्याच जणांमध्ये न्यूनगंड निर्माण झालेला आढळतो. काही जणांमध्ये मानसिक संतुलन बिघडून जाते. त्यामुळे यावर योग्य वेळेस तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली उपचार करणे गरजेचे आहे. काही वेळा स्त्रीरोगतज्ज्ञ, एंडीक्राइनॉलॉजिस्ट (अंतस्रावतज्ज्ञ), आहारतज्ज्ञ यांच्या संयुक्त मदतीने उपचार सुरू ठेवावे लागतात. 
तसेच अभ्यासात अडखळणाऱ्यांना कामातील खाचखळगे पार करताना पुस्तकी व्याख्या उलगडू लागतात. अभ्यासाचा, पाठांतराचा कंटाळा जातो. हातातून काम गेल्यावर त्या परीक्षांची भीती तर जातेच; पण आत्मविश्‍वासाने त्यांना सामोरे जाणे शक्‍य होते. शिवाय जेव्हा केव्हा जसे मिळतील त्या मार्कांनी पदवी घेऊन ते बाहेर पडतात तेव्हा मुलाखतीत ठणकावून सांगू शकतात, की तुमच्याकडे केल्या जाणाऱ्या कामासंदर्भातील मला अमुक काम नक्की करता येते. खरे सांगायचे तर उपयुक्त पदवीधर असाच तयार होतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News