जाणून घ्या, अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 January 2020

अ‍ॅनिमेशनचा अभ्यासक्रम करताना संगणक व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॅरेक्टर डिझाईन, मॉडेलिंग, रिगिंग, टे्श्चरिंग, अ‍ॅनिमेशन, लायटिंग, रेंडरिंग व स्पेशल इफेक्ट या गोष्टी शिकाव्या व आत्मसात कराव्या लागतात.

वेब डिझाईनप्रमाणेच यामध्ये अनेक सॉफ्टवेअरचा वापर करून संगणकावर आपल्याला हा अभ्यासक्रम शिकता येतो. कोणतीही गोष्ट अ‍ॅनिमेट करावयाची असल्यास प्रथम येते ‘कॅरेक्टर डिझाईन. यामध्ये आपण त्या व्यक्तीचे रूप, स्वभावविशेष, ती कशी दिसेल या सर्वांचा विचार करून त्याचे चित्र (स्केच) तयार करतो. त्यानंतर त्याचे ३-डी मॉडेल तयार केले जाते. लहान लहान त्रिकोण, चौकोन यांचे जाळे त्या मॉडेलमध्ये तयार केले जाते. याला मॉडेलिंग असे म्हणतात.

मॉडेलिंगनंतर त्या चित्रास टे्नश्चरिंग केले जाते. म्हणजेच त्याची त्वचा, कपडे, रंगसंगती या साहाय्याने त्या चित्राचे बाह्यरूप सजवले जाते. टे्श्चरिंगसोबतच रिगिंग केले जाते. यामध्ये त्या चित्राच्या सापळ्यात वेगवेगळे जॉइंट्स (सांधे) बसवले जातात, ज्या योगे चित्राची होणारी हालचाल तालबद्ध व मापात होईल. या सर्वांसाठी शरीरशास्त्र या विषयाचा अभ्यास खूपच उपयुक्त ठरतो.

यानंतर त्या चित्रास हालचाल दिली जाते. म्हणजेच चलचित्र. नंतर त्याच चित्रास सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने लायटिंग, रेंडरिंग व स्पेशल इफेक्ट्स दिले जातात. याचाच अर्थ आपल्याला अ‍ॅनिमेशनचा अभ्यासक्रम करताना संगणक व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॅरेक्टर डिझाईन, मॉडेलिंग, रिगिंग, टे्श्चरिंग, अ‍ॅनिमेशन, लायटिंग, रेंडरिंग व स्पेशल इफेक्ट या गोष्टी शिकाव्या व आत्मसात कराव्या लागतात.

यानंतरच्या अभ्यासक्रमाची पुढची पायरी म्हणजे वरीलपैकी कोणत्याही एका प्रकारात प्रावीण्य मिळवणे; कारण प्रॉडक्शन हाउस/स्टुडिओमध्ये काम करताना अ‍ॅनिमेशनबरोबरच मॉडेलिंग/ रिगिंग/ टे्श्चरिंग/ अ‍ॅनिमेशन/ लायटिंग/ रेंडरिंग व स्पेशल इफेक्ट यातील एकाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रॉडक्शन हाउस म्हणजे एक उत्तम टीम. प्रत्येकाची कामे वेगळी; पण ती एकमेकांवर अवलंबून असलेली. प्रत्येक कामाची व्यवस्थित सांगड घातली गेली असल्यास एक उत्तम फिल्म तयार होऊ शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News