असे हे अवघड तिर्यक वृक्षासन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 September 2019
  • मन शांत होण्यास मदत होते. कंबरेतून वाकल्याने तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.

हे तोलात्मक आसन असून, करण्यासही सोपे आहे. फक्त एकाग्रतेची आवश्यकता असते. यापूर्वी आपण वृक्षासन कसे करतात, हे पाहिले आहे. सुरवातीला तिर्यक वृक्षासनाचा अर्धवृक्षासनामधून सराव करावा. ते जमू लागल्यावर वृक्षासन स्थितीमधून सराव करावा.

येथे आपण हे आसन वृक्षासनामधून कसे करतात, ते पाहणार आहोत. प्रथम उजवा पाय वर उचलून तळपाय डाव्या पायाच्या मांडीजवळ टेकवावा. दोन्ही हात बाजूने वर घ्यावेत. हाताचा नमस्कार करावा. त्यानंतर वर घेतलेल्या पायाच्या बाजूला कंबरेतून वाकावे. तिर्यक ताडासन करतो त्याप्रमाणे वाकावे.

यावेळी सरळ रेषेतच वाकावे. नजर स्थिर असावी. हात ताठ असावेत. कंबरेतून पुढे किंवा मागे वळून झुकू नये. आसनस्थितीत शक्य असेल तितकावेळ स्थिर राहावे. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आसनस्थिती असावी. आसन सोडताना सावकाश उलटक्रमाने सोडावे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही ते करावे. या आसनाच्या सरावाने एकाग्रता वाढते. मन शांत होण्यास मदत होते. कंबरेतून वाकल्याने तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News