असा घडवा जीवनात बदल

मनीष प्रताप गोरे
Sunday, 9 June 2019
  • मी डॉ. दीक्षित यांच्या यू-ट्यूबवरील व्हिडिओ व माहितीने प्रेरित होऊन १५ ऑगस्ट २०१८ला केली डाएटची सुरवात
  • नियमितपणे पाळलेल्या डाएट व व्यायामाचे चांगले फायदे झाले

 डॉ. दीक्षित यांच्या यू-ट्यूबवरील व्हिडिओ व माहितीने प्रेरित होऊन १५ ऑगस्ट २०१८ला या डाएटची सुरवात केली. त्यानुसार रोज फक्त दोन वेळा जेवण आणि १० किलोमीटर चालणे सुरू केले. त्या वेळी माझे वजन ७२ किलो होते. पोटाचा घेर १०२ सेंटिमीटर होता. त्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये तपासणी केली, तेव्हा एचबीए१सी ५.३ व फास्टिंग इन्शुलिन १०.४ होते.

नियमितपणे पाळलेल्या डाएट व व्यायामाचे चांगले फायदे झाले. यंदाच्या मार्चमध्ये मी पुन्हा तपासणी केली. माझे वजन ६० किलोवर आले. एचबीए१सी ५.१ आणि फास्टिंग इन्शुलिनही कमी होऊन ८.३ वर आले. डॉक्‍टरांनी रक्तदाबाची गोळीही बंद केली. या डाएटमुळे माझ्या जीवनात खूपच बदल घडवून आणला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News