अशी होणार महाविद्यालयातही प्रवेश प्रक्रिया सोपी; जाणून घ्या

मुरलीधर करळे
Monday, 10 June 2019

दरवर्षी प्रवेष प्रक्रिया उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य प्रवेष प्रक्रिया कक्षातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. यादीनुसार विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजजात प्रवेश मिळाला आहे. त्या संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रे व शुल्काचा ड्राफ्ट सादर करावा लागतो

नगरः मेडिकल किंवा इंजिनिअरींग प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी कॉलेजमध्ये प्रवेश आणि कागदपत्रांचे सादरीकरण यादरम्यानचा वेळ आणि आर्थिकदृष्ट्या खर्चिक होऊ नये, यासाठी तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी विभाग, मत्य व दुग्ध विभाग व कला शिक्षण या विभागांमार्फत सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदणी तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी नगरच्या छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यात सेतू सुविधा केंद्रास मान्यता मिळाली आहे.

दरवर्षी प्रवेष प्रक्रिया उत्तीर्ण झाल्यानंतर राज्य प्रवेष प्रक्रिया कक्षातर्फे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. यादीनुसार विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजजात प्रवेश मिळाला आहे. त्या संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रे व शुल्काचा ड्राफ्ट सादर करावा लागतो. यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची भरपूर धावपळ होते.

पालक व विद्यार्थ्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च या दोन्ही गोष्टींचा अपव्यय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्रवेष प्रक्रिया कक्षातर्फे महाविद्यालय आणि विद्याथ्र्यामध्ये ‘सेतू असिस्टंट अॅडमिशन रजिस्टर’(सार) या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन सेतू उभारण्यात आला आहे. सेतूअंतर्गत ‘एक खिडकी’ उपक्रम प्रथमच शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. यामुळे इंजिनीअरींग, मेडिकल, कृषी, मत्स्यविज्ञान, नर्सिंग, फाइन आर्टस, आयुष अषा कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती, समुपदेषन नोंदणी, कागदपत्रे अपलोड करणे आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी ते अंतिम प्रवेष ही प्रक्रिया एकाच ठिकाणावरून पार पाडता येणार आहे.

या सेतू सुविधा केंद्रावर अनेक विद्यार्थी येऊन माहिती घेत आहेत व नावनोंदणी करीत आहेत. महाविद्यालयामध्ये असलेल्या परिपूर्ण संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा व तज्ञ प्राध्यापक व समुपदेषक विद्याथ्र्यांना उपलब्ध आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News