राष्ट्रस्तरीय 'ज्युनिअर तंत्रोत्सव-२०२०'मध्ये काळसेकर पॉलिटेक्निकचे यश 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 12 March 2020

नुकत्याच वसई येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनीरिंगद्वारा आयोजित 'ज्युनिअर तंत्रोत्सव - २०२०' या राष्ट्रस्तरीय तंत्रमहोत्सवात काळसेकर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल  इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय व र्षातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन बहुतांशी स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले

पनवेल : अंजुमन-ए-इस्लाम या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रस्तरीय 'ज्युनिअर तंत्रोत्सव -२०२०' मध्ये लक्षणीय यश संपादन केले. 

नुकत्याच वसई येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनीरिंगद्वारा आयोजित 'ज्युनिअर तंत्रोत्सव - २०२०' या राष्ट्रस्तरीय तंत्रमहोत्सवात काळसेकर पॉलिटेक्निकच्या सिव्हिल  इंजिनिअरिंग विभागाच्या द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन बहुतांशी स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले.  

अबसार मुकादम, मुस्तफा डांगे, अंकित गायकर, आफताब खान, समीर शेख, कैस बशीर खान, शेख साफवाण तनवीर, साफवाण फकी शकील, खान इनामुल हक, खान मोहम्मद अर्श, खान सोहेल, सय्यद मासूम अली, शाहनवाज सय्यद, झैद खान, अझमेन अन्सारी, अरफाज खान, काझी रेहान, फैझान शेख, हीना तमके, तनझीला सुरय्या आदी सहभागी विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व रोख रु. ६५०० /- देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे एक्झेकेटीव्ह चेअरमन बुऱ्हाण हारीस, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ.अब्दुल रझ्झाक होनुटगी, काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.रमजान खाटीक, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख रुपाली खडतर, महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News