स्टायलिश लूक ब्ल्यू ॲण्ड व्हाइटचा

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 October 2019

एक ट्रेंड म्हणजे व्हाईट अँड ब्ल्यू. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मुले व मुली सर्वांकडेच पांढऱ्या रंगाचे कपडे असतात. मग कधी कुर्ती, टॉप्स असो, शर्ट किंवा अगदी टी-शर्ट अशा अशा गडद रंगांचे सांगायच झालं तर रॉयल ब्ल्यू रंग पेहरावात वापरले तर स्वत: केलेल्या पेहरावाला खूप उठावदारपणा येऊन जातो.

फॅशनमध्ये सतत नवनवे ट्रेंड येत असतात. पण कधी कधी काही जुने ट्रेंड्‌स अचानक इतके लोकप्रिय होतात की ज्यांचे नाव ते अनेक वर्ष असलेले हे ट्रेंड अजूनही नवेच भासतात. असाच एक ट्रेंड म्हणजे व्हाईट अँड ब्ल्यू. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत मुले व मुली सर्वांकडेच पांढऱ्या रंगाचे कपडे असतात. मग कधी कुर्ती, टॉप्स असो, शर्ट किंवा अगदी टी-शर्ट अशा अशा गडद रंगांचे सांगायच झालं तर रॉयल ब्ल्यू रंग पेहरावात वापरले तर स्वत: केलेल्या पेहरावाला खूप उठावदारपणा येऊन जातो.

सध्या ब्ल्यू अँड व्हाइट हा ट्रेंड बराच लोकप्रिय होताना दिसतोय. बॉलीवूड कलाकारांमध्ये तर जरा जास्तच साऱ्यांनीच आपलंस केला आहे. फॅशनमध्ये ट्रेंड नेहमी बदलत राहतो. पण मॉन्सूनमध्ये ब्ल्यूची डिमांड प्रत्येक वर्षी वाढतच आहे. ब्ल्यू एक वर्सेटाइल आणि रॉयल कलर आहे. सध्या वेस्टर्न वियरचे असे काही विकल्प आहे. ज्यात ब्ल्यू अँड व्हाईटचा क्रेझ बाजारात बघायला मिळत आहे. नेहमीच मॉन्सूनचा लेटेस्ट ट्रेंड ब्ल्यू अँड व्हाइट असतो. यात कॉटन ते लिनेनपर्यंत फॅशनमध्ये इन आहे.

त्यासोबतच टाऊझर्सही यांच्यासोबत चर्चेत आहे. ब्ल्यू शर्टासोबत ग्रे पेंटचे कॉम्बिनेशन परफेक्‍ट मॅच होते. तसेच ब्ल्यूचे फॉर्मल विअर ऑफिस ते नाइट पार्टीसाठी योग्य आणि हटके दिसून येतात. हल्ली इव्हनिंग पार्टीसाठी ब्ल्यू शर्ट, ब्लेझर, टाउझर आणि टी शर्टच्या बऱ्याच व्हरायटी बाजारात पाहायला मिळत आहेत. युवतीही आउटिंग असो किंवा हॉलिडे प्लॅन करताना तर ब्ल्यू कलर वन पीस ड्रेसचे शॉर्ट किंवा लॉग ऑप्शन आवडीनुसार वापरत आहेत. त्या पेहरावानुसार पिकनिट पॉइंटला सुद्धा जाताना त्यांच्यासोबतच सनग्लास घातल्यामुळे अनेकांना घायाळ करून सोडून जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News