सापांशी स्टंटबाजी करणं तरूणाच्या अंगलट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 July 2020
  • नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडून सापांशी खेळणं किंवा इतरांना स्टंटबाजी करून दाखवणं डोंबिवलीतील एका तरूणाच्या चांगलचं अंगलट आलं आहे.
  • विशेष म्हणजे पकडलेल्या सापांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तरूणाला तात्काळ ताब्यात घेतले.

नागपंचमीच्या दिवशी सापांना पकडून सापांशी खेळणं किंवा इतरांना स्टंटबाजी करून दाखवणं डोंबिवलीतील एका तरूणाच्या चांगलचं अंगलट आलं आहे. विशेष म्हणजे पकडलेल्या सापांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तरूणाला तात्काळ ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे असलेले साप सुध्दा वनविभागाने हस्तगत केले आहेत. 

या तरूणाचं नाव निरव गोगरी असून तो डोंबिवलीत राहायला आहे. नागपंचमीच्या दिवशी साप पकडून त्याने राहत असलेल्या सोसायटीत आणले होते. तिथे तो सोसायटीतील लोकांना स्टंटबाजी करून दाखवत होता. साप दुध कधीच पीत नाही, तरीही त्याने सापाचे तोंड दुधात बुडवल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. तर काही सापाचे तोंड दाबून लोकांच्या अंगावर टाकलेले आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ तो युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर शेअर करायचा. परंतु कालचा झालेला प्रकार वनविभागाच्या अधिका-यांना समजला आणि त्यांनी या तरूणाला तात्काळ ताब्यात घेतले. 

लॉकडाउनच्या काळात अर्थिकमंदी आल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी खिशात पैसे नसल्याने असे व्हिडीओ करून तो युट्यूब सारख्या सोशल मीडियावर वापरत होता, असं ताब्यात घेतलेल्या तरूणाने कल्याण वनक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांना सांगितले. साप वा अन्य पशू-पक्षांचे खेळ करणे, त्यांना खेळवणे कायद्याने गुन्हा असल्याने या तरूणावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे माहिती कल्पना वाघेरे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News