अभ्यासाची आवड लागली की संस्काराची शिदोरी आपोआप जमा होते : अनुराधाताई चव्हाण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

‘‘गामीण भागातील मुलांची जडणघडण ही जिराफ या प्राण्याच्या पिलासारखीच होत असते. ज्याप्रमाणे जिराफ आपल्या पिलाचे संकटापासून रक्षण व्हावे त्यासाठी बालवयातच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त करतो''

फुलंब्री : गणोरी (ता. फुलंब्री) येथील ज्ञानेश्वरी गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक गणेश गावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, गरुडझेप ॲकॅडमीचे प्रा. सुरेश सोनावणे उपस्थित होते.

अनुराधाताई चव्हाण म्हणाल्या, ‘‘मुलांनी बालवयात संस्कार, संस्कृतीची जोपासत करीत आनंदाने हसत-खेळत शिकावे. अभ्यासाची आवड लागली की संस्काराची शिदोरी आपोआप जमा होते. गणेश गावडे म्हणाले, ‘‘गामीण भागातील मुलांची जडणघडण ही जिराफ या प्राण्याच्या पिलासारखीच होत असते. ज्याप्रमाणे जिराफ आपल्या पिलाचे संकटापासून रक्षण व्हावे त्यासाठी बालवयातच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचप्रकारे पालकांनी आपल्या पाल्याची जोपासना करावी. मुलांना जोपासणे, त्यांची योग्यरीत्या जडणघडण करणे आवश्यक आहे. श्री. बागडे म्हणाले, ‘‘मुलांनी इतिहासातील दाखले अभ्यासून त्यातून भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा घेतली पाहिजे. संचालक प्रा. अक्षय न्यायाधीश यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वरी गुरुकुल शाळेचा शैक्षणिक आढावा विविध उपक्रमांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून सादर केला. संस्थेचे अध्यक्ष विलासराव न्यायधीश, उपाध्यक्ष अनिल तांदळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र तांदळे, सरपंच पद्माताई जाधव, उपसरपंच बाळासाहेब तांदळे, सदस्य कैलास सोनावणे, शिवाजी रोठे, तेजराव चव्हाण, सुदाम चव्हाण, राजू जाधव, नामदेव भादवे, बाबासाहेब तांदळे, भीमराव चव्हाण, आकाश उबाळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वर्षा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अमृता घुले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका रूपाली मगरे, दिव्या गायकवाड, सेविका पार्वती पेहेरकर यांनी प्रयत्न केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News