अपूर्णांकाचा अभ्यास असा करावा!

अरविंद कांबळे
Friday, 7 June 2019

आजच्या भागात आपण अपूर्णांक या घटकाचा अभ्यास करणार आहोत.

विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण भागाकाराच्या कसोट्या, त्याचबरोबर त्यांचा वापर करताना आपण कोणत्या प्रकारे संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, याचा अभ्यास केला आणि आपल्या सरावासाठी काही उदाहरणे सोडविण्यासाठी दिली होती. आपण ती नक्कीच आपल्या पालकांच्या मदतीने सोडविले असतील, अशी आशा आहे.

आजच्या भागात आपण अपूर्णांक या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मागील काही घटकांचा अभ्यास करताना आपण साधारणपणे आपल्याला अपूर्णांकाची ओळख आहे, असं गृहीत धरून काही माहिती आपण पाहिली आहेच. उदाहरणार्थ...

रुपये, पैसे या संदर्भात माहिती पाहत असताना आपण सव्वा, अर्धा, पाऊण असे शब्द पाहिले आहेतच. या प्रकरणात आपण अपूर्णांकाबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे ज्या संख्या अपूर्ण असतात आणि त्या आपल्याला पूर्ण स्वरूपात मांडता किंवा लिहिता येत नाहीत.

उदाहरणार्थ, माझ्याजवळ एक पेढा आहे. त्यातील अर्धा पेढा मी माझ्या भावाला दिला तर माझ्याजवळ किती पेढा शिल्लक उरला?

मित्रांनो, वरील उदाहरणात माझ्याजवळ अगोदरच एक पेढा आहे आणि त्यातीलही अर्धा पेढा मी माझ्या भावाला दिला. वरील दोन्ही संख्या या पूर्ण नाहीत हे समजले; पण मग त्यांची मांडणी करणे म्हणजेच अपूर्णांक समजून घेणे होय. 

अपूर्णांक समजून घेण्यापूर्वी आपल्याला त्या विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्‍यक आहे. चला तर मग

प्रथम आपण अपूर्णांक कसा लिहिला किंवा वाचला जातो, याची माहिती पाहूया.

मित्रांनो, बाजूला दिलेल्या संख्या अपूर्णांक म्हणतात. यात रेषेच्या ५/६ वरील अंकाला अंश म्हणतात; तर रेषेच्या खालील अंकाला छेद असे म्हणतात.

१) ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात.
२) ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात.
३) ५६ या अपूर्णांकाचे ५ अंश छेद ६ असे वाचन करतात किंवा ५ छेद ६ असेही अपूर्णांकाचे वाचन करतात.
४)  अपूर्णांकाचे लेखन... सात अंश छेद बारा याचे लेखन ७/१२ असे करतात.    
                     

मित्रांनो, ही झाली पद्धत अंकात अपूर्णांक लिहिण्याची किंवा वाचनाची. पण, आकॄतीच्या सहाय्यानेही अपूर्णांक समजून घेता येतो. अपूर्णांक समजून घेणे आपल्यासाठी अत्यावश्‍यक आहे; तर पुढील भागात आपण आकृतीच्या सहाय्याने अपूर्णाक समजून घेऊ...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News