आता विद्यार्थ्यांना जीमेलवर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र; घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 August 2020

बार्टीने ऑनलाइन जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यामुळे उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी समोर खेटे मारण्याची आवश्यकता नाही.

पुणे :  नाविन्यपूर्ण, समाजोपयोगी उपक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) ओळखली जाते. कौशल्य विकास प्रकल्प, समतादूत पथदर्शी प्रकल्प, स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेस असे विविध उपक्रम राबवून समाजाच्या प्रगतीसाठी अतत कार्यरत असते. आता बार्टीने ऑनलाइन जात प्रमाणपत्र देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यामुळे उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणी समोर खेटे मारण्याची आवश्यकता नाही. ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी नोंदवलेल्या इमेलवर थेट पीडीएफ स्वरुपात कास्ट व्हॅलिडीटी मिळणार आहे. त्यामुळे अतिषय किचकट असलेली जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीया आता सोपी होणार आहे. 

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीया सुरु केली जाईल असे आश्वासन दिले होते. दिलेल्या अश्वासनाची परिपूर्ती मुंडे यांनी केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आणि नोंकरीसाठी जात प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जात प्रमाणपत्र पडताळणी जिल्हाच्या ठिकाणी असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना समितीकडे खेटे मारावे लागत होते. त्यात वेळ, पैसा, श्रम मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा. ऑनलाई पडताळणी सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अर्ज करता येणार आहे. तसेत विद्यार्थ्यांच्या थेट जीमेलवर पीडीएफ स्वरूपात कास्ट व्हॅलेडीटी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे श्रम, वेळ, पैसा यांच्या बचत होईल. ऑनलाइन प्रणालीमुळे अर्जाचे स्टेट्स, अर्जाची सध्या स्थिती काय आहे? याची अद्यावत माहिती उमेदवारांना मिळणार आहे.

अर्ज कसा करावा 

ज्या उमेदवारांना जात पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर अर्ज भरावा. त्यासोबत आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करावी. सरकारने ठरवून दिलेली फी ऑनलाइन स्वरूपात भरावी. त्यानंतर बार्टी उमेदवारांच्या प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी करेल आणि यशस्वी रित्या अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना पीडीएफ स्वरूपात त्याच्या जीमेल कास्ट व्हॅलिडीटी पाठवेल.

'बार्टीने ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात संपूर्ण राज्यामध्ये ही प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर उमेदवारांना पीडीएफ स्वरूपात जीमेवर कास्ट व्हॅलिडीटी पाठवली जाणार आहे' अशी माहिती अमरावती जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे यांनी दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News