चुकीच्या प्रश्‍नांचा फटका विद्यार्थ्यांना बसणार नाही

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

पुणे - राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्नांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रश्नांमध्ये चुका असल्यास तेवढे प्रश्न मूल्यमापनातून वगळण्यात येतील, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

पुणे - राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्नांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रश्नांमध्ये चुका असल्यास तेवढे प्रश्न मूल्यमापनातून वगळण्यात येतील, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.

परिषदेचे अधीक्षक संजय काळे म्हणाले, ‘‘एका प्रश्नातील शब्द अधोरेखित करायचा राहिला होता, एवढी एक त्रूटी समोर आली आहे. ही छपाईवेळी झालेली चूक आहे.’’

प्रश्नपत्रिकेतील चुकांबाबत परिषदेत कार्यशाळा होणार आहे. त्यात चुकीचे प्रश्न सापडले, तर परीक्षेच्या मूल्यमापनातून ते वगळण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर काही परिणाम होणार नाही. म्हणजे दोन प्रश्न चुकले असतील, तर मूल्यमापन करताना त्या प्रश्नांचे गुण कमी केले जातील म्हणजे निकाल १५० ऐवजी १४८ पैकी किती गुण मिळाले, यावर निश्‍चित होईल.

परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले, ‘‘प्रश्न चुकले असतील, तर त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.’’

आठवडाभरात उत्तरसूची
प्रश्नपत्रिकांच्या छाननी झाल्यानंतर परिषद परीक्षेची पहिली उत्तरसूची जाहीर करील. आठवडाभरात ही सूची परिषदेच्या संकेतस्थळावर टाकली जाईल. त्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना पाठविता येतील. त्या विचारात घेऊनच निकाल प्रसिद्ध केला जाईल, असे परिषदेकडून सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News