घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी; राज्य सरकारचा अभिनव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 September 2020

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने करणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

मुंबई : विद्यार्थ्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने अभिनव उपक्रम सुरु केला. पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने करणार आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. 

राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांना प्रत्यक्ष रोजगारासाठी भटकंती करण्याची आवश्यकता नाही. घरी बसून एका क्लिकवर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. नंतर व्हाट्सॲप, इमेल, फोन कॉलिंग, झूम अॅप, गुगल मीटींग इत्यादी तंत्रज्ञानाद्वारे उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीनंतर उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र देऊन नोकरीसाठी बोलावले जाते. त्यामुळे आता घरी बसून नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली.  

अर्ज कसा करावा 

 • प्रथम इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर जावे
 • JOB SEEKER (FIND JOB) पर्याय निवडावा 
 • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यात आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करावे
 • उमेदवारांनी यापुर्वी रोजगार पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी कारावी लागेल
 • त्यासाठी 'नोंदणी' नावावर क्लिक करावे
 • एक ननीन पेज ओपन होईल त्यात नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, लिंग आधारक्रमांक, भरुन नोंदणी करावी
 • त्यानंतर साइन इन करून आपला जिल्हा निवडावा.
 • पंडित दीनदयाल उपाध्याय चालू रोजगार मेळावा किंवा भविष्यात रोजगाराचे आयोजन यावर क्लिक करुन सविस्तर माहिती भरावी
 • 'I Agree' पर्याय निवडावा 
 • शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना विविध कंपन्यांच्या जागा दिसतील त्यावर  Apply करावे 
 • ज्या जिल्ह्यात मोळावा आयोजिक होणार आहे त्या ताखेला ऑनलाईन मुलाखती घेतली जाईल
 • मुलाखतीत पास होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नियुक्ती पत्र दिले जाईल.
 • त्यानंतर उमेदवारांनी नोकरीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

जिल्हानिहाय मेळाव्याचे वेळापत्रक 

जिल्हा    मेळाव्याची तारीख    ऑनलाईन अर्ज 

हिंगोली     31 ऑग ते 6 सप्टें       येथे क्लिक करा 
परभणी     09 ते 11 सप्टेंबर        येथे क्लिक करा 
नांदेड       09 ते 11 सप्टेंबर        येथे क्लिक करा 
सोलापूर    08 ते 11 सप्टेंबर         येथे क्लिक करा 
यवतमाळ  08 ते 11 सप्टेंबर        येथे क्लिक करा 
गडचिरोली 10 ते 11 सप्टेंबर       येथे क्लिक करा 
मुंबई उप   07 ते 14 सप्टेंबर       येथे क्लिक करा 
धुळे    1    5 ते 16 सप्टेंबर         येथे क्लिक करा 
नंदूरबार    16 ते 17 सप्टेंबर       येथे क्लिक करा 
भंडारा       15 ते 18 सप्टेंबर       येथे क्लिक करा 
सातारा      15 ते 18 सप्टेंबर       येथे क्लिक करा 
नाशिक     14 ते 18 सप्टेंबर        येथे क्लिक करा 
उस्मानाबाद 14 ते 18 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
अकोला      14 ते 19 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
सिंधुदुर्ग       22 ते 25 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
औरंगाबाद   23 ते 25 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
बीड           21 ते 25 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
रत्नागिरी      28 ते 30 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
पुणे            28 ते 30 सप्टेंबर      येथे क्लिक करा 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News