बारावीमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार 'ही' आकर्षक भेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020

बारावीच्या गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांना लॉपटॉप विकत घेण्यासाठी २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र सरकारद्वारे दिले जाणार आहेत.

भोपाळ : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला मध्ये प्रदेश माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या बारावीचा निकाल सोमवारी (ता. २७) जाहीर झाला. एकूण ६८. ८१ टक्के विद्यार्थी पास झाले. त्यात ७३. ४० टक्के मुली तर ६४. ६६ टक्के मुले यांचा समावेश होता. यावेळी पन्हा एकदा मुलींनी बाजी मारली. जे विद्यार्थी गुणवत्तेत पास झाले त्यांना मध्य प्रदेश राज्य सरकारकडून मोफत लॉपटॉप दिले जाणार आहे, अशी माहिती एमपीचे मुख्यंमत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. 

 

विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्य सरकार वेगवेगळ्या योजना आखत असतात. अशीच एक योजना मध्य प्रदेश सरकारने यंदा पासून सुरु केली. बारावीच्या गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थ्यांना लॉपटॉप विकत घेण्यासाठी २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र सरकारद्वारे दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा फायदा होणार आहे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

नापास विद्यार्थी 'थांबू नका'!

दहावी, बारावी परीक्षेत जे विद्यार्थी नापास झाले. त्यांचे पुनर्रवसन करण्यासाठी एमपी सरकारने एक अनखी योजना सुरु केली, त्याचे नाव 'रुक जाना नहीं' असे आहे. या योजनेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेर परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यात मदत होईल. फेर परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे. फेरपरीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात होईल. सन २०१९- २० या शैक्षणिक वर्षात नापास झालेले विद्यार्थी फेर परीक्षेसाठी पात्र राहतील. 'रुक जाना नहीं' सारखी योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावी परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची दरवर्षी जुलै महिन्यात परीक्षा घेतली जाते. मात्र यंदा कोविड- १९ विषाणूच्या संसर्गामुळे परीक्षा स्थगीत करण्यात आली.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News