परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत परीक्षा देता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत परीक्षा देता येणार

परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत परीक्षा देता येणार

गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी नुकतीच पुर्ण केली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा १७ हजार २२९ विद्यार्थी देणार असून ७०६ विद्यार्थी परीक्षेला ऑफलाइन बसणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण शक्य नाही असे विद्यार्थी १५ दिवसात परीक्षा देतील. विशेष म्हणजे नापास विद्यार्थ्यांना देखील संधी दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मंत्री उदय सामंत यांनी गडचिरोलीमधील गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या कामाचा आढावा घेतला. सगळ्या गोष्टींची चौकशी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती सांगितली. सर्वांत महत्त्वाचं आपत्ती व्यवस्थापन विभागाला अधिक काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देणार आहेत, ते घाबरूनच परीक्षा देतील. त्यासाठी इंटरनेट, मोबाइलसह सर्व आवश्यक तांत्रिक बाबींचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परीक्षा देणा-या विद्यार्थ्याला प्रश्न बॅंक देण्यात येणार आहे. ५० टक्के अंतिम परीक्षेचे गुण व ५० टक्के अंतर्गत गुण यावरून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल असंही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी ६० कोटींचा निधीला मंजूरी देण्यात येणार आहे. सध्या विद्यापीठाकडे ३५ एकर जमीन असून आणखी १५ एकर जमीन देण्यात येणार आहे. तसेच यासाठी २० कोटीचा निधी देणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. सध्याची पदभरती ही निव्वळ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आलेली आहे. विद्यापीठाची विकासाची प्रक्रिया केंद्र आणि राज्यात राबविण्यात येणार आहे. झालेल्या पत्रकार परिषदेला प्रभारी कुलगुरू डॉ.श्रीनिवास वरखेडी, प्र.कुलगुरू डॉ.भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News