निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी इथे करा अर्ज 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 29 July 2020

परीक्षेत मिळालेल्या निकालवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने दुस-या दिवशी गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्याची व्यवस्था केली आहे. 

निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी इथे करा अर्ज 

महाराष्ट्र - आज दहावीचा दुपारी १ वाजता निकाल असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारण कोरोनामुळे यंदाचा निकाल खूपचं लांबणीवर पडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण झाली होती. पण आज दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in संकेतस्थळावरती तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. खासकरून परीक्षेत मिळालेल्या निकालवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने दुस-या दिवशी गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्याची व्यवस्था केली आहे. 

ऑनलाइन निकाल पाहून असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडे गुणांची पडताळणी किंवा उत्तपत्रिका पाहायची असेल तर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उद्यापासून विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी किंवा उत्तपत्रिका पाहण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर जाऊन योग्य माहिती भरून अर्ज करायचा आहे. हा अर्ज विद्यार्थी स्वत: ही करू शकतो किंवा शाळेमार्फतही करू शकतो. 

गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना आगोदर उत्तरपत्रिका मागवावी लागेल. ती पाहिल्यानंतर तुम्ही गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकता. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर तुम्ही ५ दिवसांच्या आत गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकता. 30 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकता. तर 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंतची छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून तुम्ही ऑनलाइन शुल्क भरू शकता. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News