जिल्हा परिषदेच्या शाळेत होतेय विद्यार्थीनींची कुचंबणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत मुला-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृह असणे बंधनकारक आहे. अनेक शाळात ते बांधण्यात आले आहे. परंतु, त्याची नियमित स्‍वच्‍छता करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शाळेतील स्‍वच्‍छतागृह  वाईट अवस्‍थेत आहे.

जालना : शंभराहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह नसल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची मोठी कुचंबणा होत आहे. मुलींबरोबर तब्बल १६० शाळेत मुलासांठीही स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृह नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बेटी बचाव , बेटी पढावचा नारा देणारे शासन आणि प्रशासन मुलींच्या अस्मितेबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल किती गाफील आहे, याचा प्रत्यय समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात दीड हजार शाळा आहेत. त्यांपैकी  हजारो शाळा वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याकडे दुर्लक्ष असताना जवळपास अडीचशेहून अधिक शाळात मुली-मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह नसल्याचे बाब समोर आली आहे. 

स्‍वच्‍छतागृह नसल्याने मुलींना घरी जाऊन परतावे लागते तर अनेकदा आडोसा शोधत नैसर्गिक विधी करावा लागतो. दरम्यान मुलींचा जन्मदर आणि शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी बेटी बचाव-बेटी पढाव मोहिमेवर लाखो रुपयाचा खर्च करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासन मुलींसाठी स्‍वच्‍छतागृह बांधू शकत नाही का? असा संतप्त सवाल पालकवर्गातून विचारल्या जात आहे. शिक्षण विभागातर्फे  स्‍वच्‍छतागृह देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १११ शाळामध्ये मुलींसाठी  तर १६० शाळेत मुलांचे स्‍वच्‍छतागृह नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या सभापती पुजा सपाटे यांनी हा आकडा यापेक्षाही अधिक असल्याचे सांगितले आहे.

#शालेय व्यवस्‍थापन समित्या नावालाच
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत मुला-मुलींसाठी स्‍वतंत्र स्‍वच्‍छतागृह असणे बंधनकारक आहे. अनेक शाळात ते बांधण्यात आले आहे. परंतु, त्याची नियमित स्‍वच्‍छता करण्यात येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शाळेतील स्‍वच्‍छतागृह  वाईट अवस्‍थेत आहे. शालेय व्यवस्‍थापन समित्यांचेही याकडे लक्ष नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News