तंत्रनिकेतन अभ्यासाच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 August 2020
  • दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल हे जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले.
  • त्यानंतर दरवर्षी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे ऑफलाईन होणारे प्रवेश यंदा मात्र कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला गेला.
  • तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून १० ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली.

नागपूर :- दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल हे जुलै महिन्यात जाहीर करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाचे ऑफलाईन होणारे प्रवेश यंदा मात्र कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला गेला. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून १० ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. परंतु गेल्या आठ दिवसात तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या प्रवेशाची संख्या लक्षात घेता यावर्षी विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसते. प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यापासून गेल्या आठ दिवसात केवळ ५ हजार ८७८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला तंत्रनिकेतन प्रवेशाकरिता १ लाख १७८२४ जागा आहेत. 

यावर्षीच्या तंत्रनिकेतन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना त्यांच्या घरूनच ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. अर्जासोबतच संबंधिक कागदपत्र, प्रमाणपत्राचे देखील विद्यार्थ्यांना ऑनलाईन सबमिट करायची आहेत. विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची ई तपासणी केली जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, कॉम्पुटर यासारखी इलेक्ट्रॉनिक साधने नाहीत अश्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने बोलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासोबतच त्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयाची फी देखील क्रेडिट अथवा डेबिट कार्डने ऑनलाईन भरता येणार आहे. 
तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता अर्ज भरण्याची तारीख ही १० ऑगस्ट पासून सुरु झाली असून २५ ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 

गेल्यावर्षी देखील तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या निम्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या यावर्षी देखील काहीसे असेच चित्र पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरात असणाऱ्या ५० तंत्रनिकेतन महाविद्यालयात १३,१२६ जागांचा समावेश असून ६ हजार ४९४ जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News