छायाचित्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

खानापूर तालुका रहिवासी संघटनेतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त वरेरकर नाट्यगृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या गड किल्ले छायाचित्र प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे

बेळगाव: गड संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह गोवा आणि बेळगाव परिसरात गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहेत. या माध्यमातून जनजागृती हाच उद्देश आहे असे प्रतिपादन मुंबई येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी केले. खानापूर तालुका रहिवासी संघटनेतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त वरेरकर नाट्यगृहात
गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या गड किल्ले छायाचित्र प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन नियती फोंडशेनच्या अध्यक्षा सोनाली सरनोबत, माजी महापौर सरिता पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर विजय मोरे यांच्या हस्ते झाले. बेळगाव भागातील किल्लांच्या संवर्धनाची गरज मोठ्या प्रमाणात आहे, गड किल्ले आणि स्मारकांच्या संवर्धनासाठी 14 वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान कार्य करित आहे. बेळगाव परिसरातील किल्ले संवर्धन प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत असे संतोष हसुरकर म्हणाले.
 
माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन गुंजी येथील किसन चौधरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करण्यात आले. व्यास संघटनेचे अध्यक्ष पी. जे. घाडी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी  अध्यक्ष प्रेमानंद गुरव, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, उपाध्यक्ष विनायक घोडेकर, सुहास शहापूरकर, आर. आर. कुडतूरकर आदी उपस्थित होते. 

कार्याध्यक्ष मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले तर सुरेश कळ्ळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रतीक गुरव, अभिजित अष्टेकर, सागर मुतकेकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सकाळ पासूनच गड किल्ले छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून गड किल्लांची माहिती देण्यात येत होती, दुपारपर्यंत 10 हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News