सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020
  • स्पर्धेत मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाच्या 1500 हुन अधिक विध्यार्थानी सहभाग घेतला.

बेळगाव: सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती व परंपरा यांचे संवर्धन करण्यासाठी आणि आजच्या पिढीला सीमाप्रश्न व शिवकालीन इतिहास समजून यावा या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

स्पर्धेत मराठी माध्यमासह इंग्रजी माध्यमाच्या १५०० हुन अधिक विध्यार्थानी सहभाग घेतला.  युवा समितीतर्फे मराठा मंदिर येथे सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी, माजी महापौर सरिता पाटील, मराठा बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, आंनद मेनसे आदींच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले 'विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी आणि आतापासूनच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासक्रमांना धैर्याने सामोरे जावेत यासाठी भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. ज्ञान परीक्षेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील ऐकून १५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेता आहे' असे सांगितले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News