विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन विचार करावा: डॉ. मुरलीधर चांदेकर

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा यिनबझ)
Saturday, 9 May 2020

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची 'यिनबझ'साठी खास मुलाखत घेण्यात येत आहे. आज अमरावती येथील संत गाडगे बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी कुलगुरूंनी कोरोना, परीक्षा, स्किल,  नाविन्यपूर्ण उपक्रम अशा अनेक विषयांवर तरुणाईशी संवाद साधला.

अभ्यासक्रम, शिक्षण, परीक्षा, निकाल आणि नोकरी या पारंपारीक पद्धती व्यतिरिक्त काही नवीन करु शकतो का? याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. त्यातून नावीन्यपुर्ण कल्पना सुचतील. अशीच एक कल्पना विद्यार्थ्यांना सुचली, त्यातून नोटा सॉनिटायझरींग करण्याचे यंत्र तयार केले. त्याची किंमत्त फक्त 20 हजार रुपये आहे. हे यंत्र अनेक बॅंका खरेदी करतील,  त्यातून एक व्यवसाय उभा राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी  विचार करावा. त्यातून काही नवीन निर्मिती होऊ शकते.

कोरोनाचा परिणाम जसा अर्थव्यवस्थेवर झाला तसाच गंभीर परिणाम शिक्षण व्यवस्थेवर झाला. कितीही आव्हानात्मक परिस्थिती आली तरी, राष्ट्राचा, देशाचा आणि समाजाचा प्रवास थांबत नाही. प्लेग, स्वाईन फ्लू यासह अनेक संकट देशावर आले. त्या संकटाचा सामना करुन नागरिक पुढे गेले, आता कोरोनाला हरवून पुढे जायचे आहे. सूक्ष्मजीवशास्त्र, जीवतंत्रशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहकार्याने कोरोना टेस्टींग लॅब  अमरावती विद्यापीठात सुरु झाली. अमरावती आणि नांदेड फक्त दोन विद्यापीठात टेस्टींग लॉब सुरु आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. नागपूर विद्यापीठाने टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे,  त्याला  मंजुरी मिळाल्यानंतर  नागपूर विद्याीठात लवकरच ती सुरु होईल. 

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम व त्याबाबतची माहिती आम्ही विद्यापीठाच्या संकेत स्थळावर  करुन दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे. त्याचा वापर करुन विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे ज्ञान आत्मसात  करता येईल. अभ्यासक्रमावार आधारीत तज्ज्ञ प्राध्यापकांचे लेक्चर व्हिडीओ स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात होत आहे.

गरजूंच्या मदततीसाठी सरसावले विद्यापीठ

 

एनएसएस आणि नागपूर महानागरपालिकेच्या सहयोगाने दररोज 1 हजार अन्न- पाकीट गरजूंना वाटप केले आहे. लॉकडाऊन काळात  अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने एक हेल्पलाईन सुरु केली. हेल्प लाईनद्वारे विद्यार्थ्यांची माहिती गोळा करुन त्यांना धान्याचे किट उपलब्ध करुन दिले जात आहे. एनएसएसचे 20 हजार विद्यार्थी आरोग्यदूत म्हणून कोरोनाची जनजागृती करत आहे.  

विद्यार्थ्यांचे समुपदेशन

अनेकवेळा विद्यार्थ्यांना मानसिक समस्यांमधून सामोरी जावे लागते, त्यामुळे विद्यार्थांचे ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी गुगल फार्म उपलब्ध करुन दिला. गुगल फार्ममध्ये विद्यार्थ्यांनी माहिती भरायची आणि सबमीट करायची आहे. या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. सर्व समुपदेशकांचे मोबाईल नंबर विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. याचा लाभ राज्यातील सर्व विद्यार्थी घेऊ  शकतात.चौकट 3

सॉफ्ट स्किल प्रोग्राम

लॉकडाऊन काळात विद्यापीठाने सॉफ्ट स्किल प्रोग्राम सुरु केला. त्यासाठी 20 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली. तसेच व्यवसायावर आधारीत 6 नवीन कोर्स सुरु केले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 200 विद्यार्थ्यांची एक बॅच तयार करुन ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. हे सर्व कोर्सेस विनामुल्य शिकवले जातात. 

 

कोरोनानंतरची शिक्षण पद्धती

विद्यापीठांनी महाविद्यालयाशी चर्चा करुन ऑनलाईन शिक्षण पद्धती विषयी एक नेटवर्क तयार केले पाहीजे, जेणे करुन भविष्यात कोरोनासारखी परिस्थितीत निर्माण झाली तर त्याचा उपयोग होईल. 100 पैकी 60 टक्के प्रत्यक्ष वर्गात शिकवणी आणि 40 टक्के फिल्डवर्क असावे असा अभ्यासक्रम तयार केला पाहीजे. त्यात एक स्किल विषय अनिवार्य असावा.   

अंतिम वर्षाच्या परीक्षा सोडून इतर सर्व वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पन्नासटक्के मागील व पन्नासटक्के चालू सत्राच्या गुणांवर आधारित कामगिरी पाहून गुण दिले जाणार आहे.  काही दिवसांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम वर्षांची परीक्षा घ्यायची की, नाही हे निश्चित केले जाईल.
- डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरु,  संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News