विद्यार्थ्यांनी स्वतः शी स्पर्धा करावी, इतरांशी स्पर्धा करू नये : वरुण नागोरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालीच मी घडलो, त्यामुळे त्यांच्या शिकवणीतील मूलमंत्र म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः शी स्पर्धा करावी, इतरांशी स्पर्धा करू नये.’’

औरंगाबाद : विद्यार्थ्यांनी यशोशिखरावर जावे, भरपूर मेहनत घेऊन मोठे व्हावे आणि जो विद्यार्थी गुरुजनांची ही भावना ओळखून यश मिळवितो, त्या वेळी गुरुजणांकडून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो, विद्यार्थ्यांची हीच गौरवास्पद कामगिरी गुरुदक्षिणा असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयातील कर्करोग तज्ज्ञ डॉ. वरुण नागोरी यांनी रविवारी (ता. २३) केले. येथील श्री गजानन सेवा प्रतिष्ठान संचलित व्हिजन इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात डाॅ. नागोरी बोलत होते. डॉ. वरून नागोरी यांनी गुजरातचे विश्व विद्यालयामध्ये सुवर्णपदक मिळविले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या वेळी समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी हे होते. जिल्हा परिषद सभापती गंगाप्रसाद आनेराव, पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, अशोक काकडे, नंदकिशोर बाहेती, उपजिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. संजय हरबडे, साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळेकर, डॉ. विजयेंद्र नागोरी, शशिकांत देशपांडे, नगरसेवक मनिष कदम, विनोद तरटे, डॉ. सुनील कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. वरुण नागोरी म्हणाले, ‘‘आपल्या गुरुजनांनी आपला गौरव करावा, हा अनुभव खूपच वेगळा आहे. त्यातील भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. आपल्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला घडविण्यासाठी गुरू भेटतच असतात. तुम्हाला यशापर्यंत पोचविण्यासाठी गुरूने दिलेली शिकवण आत्मसात केल्यास यशाचा मार्ग आपोआप मिळतो. संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालीच मी घडलो, त्यामुळे त्यांच्या शिकवणीतील मूलमंत्र म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः शी स्पर्धा करावी, इतरांशी स्पर्धा करू नये.’’

या वेळी गंगाप्रसाद आनेराव म्हणाले, ‘‘सेलू शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा आजही कायम जोपासला जात आहे. इथे दर्जात्मक शिक्षण मिळते, इतकेच दर्जात्मक स्नेहसंमेलनदेखील होतात. इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी घडणारच आहेत, कारण गुरुजींची भूमिका खूप महत्त्वाची असते.’’
विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच, कर्करोग तज्ज्ञ म्हणून गुजरात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल माजी विद्यार्थी डॉ. वरुण नागोरी यांचे शाल, श्रीफळ, व सुवर्णपदक देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विजय फासाटे यांनी केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News