'या' शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा; युजीसीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 September 2020

उच्च शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शिष्यवृत्ती योजना सुरु केली. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे युजीसीने 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी युजीसीने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले.

नवी दिल्ली : गुणवत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षक सोडावे लागते, अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शिष्यवृत्ती योजना सुरु केली. एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे युजीसीने 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी युजीसीने ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले.

कोणत्या शिष्यवृत्ती अर्ज करता येईल

  • १. इदिरा गांधी पीजी शिष्यवृत्ती वैयक्तिक युवतींसाठी (SGC)
  • २. युनिव्हर्सिटी रँक होल्डर (URH)
  • ३. इशन उदय विशेष शिष्यवृत्ती नोर्थ इस्टन रिजन (NER) 
  • 4. पीजी शिष्यवृत्ती प्रोफोशनल कोर्स एससी/एसटी (PGSPROG)

पात्रता

  • विद्यार्थ्यांने 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा
  • रेगुलर किंवा पुर्णवेळ अभ्यासक्रम असावा
  • शिक्षण संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असावी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2020 पर्यंत 

अर्ज कसा करावा:

विद्यार्थ्यांनी आपल्या पात्रतेनूसार वर दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय निवडावा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर जावून ऑनलाईन अर्ज करावा. अर्जात दिलेली माहिती सविस्तर वाचून अचूक अर्ज भरावी. त्यानंतर अर्ज सबमीट करावा.   

थेट शिष्यवृत्ती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News