विद्यार्थ्यांनी शिक्षणासह खेळालाही प्राधान्य  द्यावे

प्रियोळ
Monday, 13 January 2020

शिक्षण हे मानवी विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे माणसाचा आणि देशाचा विकास होतो. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाकडेही तेवढ्याच आत्मियतेने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रियोळ :  शिक्षण हे मानवी विकासाचा पाया आहे. शिक्षणामुळे माणसाचा आणि देशाचा विकास होतो. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाकडेही तेवढ्याच आत्मियतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी आपेव्हाळ - प्रियोळ येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने व्यक्त केले. 

यावेळी व्यासपीठावर उद्योजक संदीप निगळ्ये, स्थानिक पंच दिशा नाईक, माजी सरपंच मंगलदास गावडे, देऊ नाईक, शिक्षिका सुनंदा कोरडे, प्रतिमा राणे व विश्‍वास गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंद गावडे यांनी मुलांनी खडतर मेहनत करून यश संपादन करावे, असे आवाहन केले. संदीप निगळ्ये म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमातही भाग घ्यायला हवा. मराठीतून शिक्षण घेणे आवश्‍यक असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी दिशा नाईक, मंगलदास गावडे, विश्‍वास गावडे व इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात देऊ नाईक, श्रीधर सतरकर व सीता जल्मी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन विशांत नाईक व सायली नाईक यांनी केले. मुख्याध्यापिका सुनंदा कोरडे यांनी अहवाल वाचन केले. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष देऊ नाईक यांनी आभार मानले. त्यानंतर मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News