एमपीएससी परीक्षांकरीता केंद्र बदलाची मागणीकरत विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले.
  • या वेळापत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
  • राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असणारे विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक ह्यासारख्या मोठ्या शहरात येऊन परीक्षेची तयारी करत असतात.

नागपूर :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे वेळापत्रक काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असणारे विद्यार्थी मुंबई, पुणे, नाशिक ह्यासारख्या मोठ्या शहरात येऊन परीक्षेची तयारी करत असतात. परंतु कोरोना महामारीमुळे ओढवलेल्या लॉकडाऊनपायी शहरात आलेले विद्यार्थी हे आपापल्या गावी निघून गेले. आता कोरोना महामारीच्या संकटात लोकसेवा आयोगाने पूर्व परीक्षेची घोषणा केली. शहरात परीक्षेची तयारी करण्याकरीता आलेल्या विद्यार्थ्यांनी ते शिकत असलेल्या ठिकाणाचं नाव परीक्षा केंद्र म्हणून लिहिलं होत. परंतु आता कोरोना काळात आपल्या गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात जाऊन परीक्षा देणं सोपं नसणार आहे. 

शासनाने लॉकडाऊन उठवलं असलं तरी अजूनही अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे चालू झालेली नाही याकारणाने गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना शहरात परीक्षा देण्याकरीता जाण्यास समस्या निर्माण होणार आहेत. ही सर्व समस्या लक्षात घेऊन विद्यार्थी संघटनांकडून जिल्ह्याच्या परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची मुभा आयोगाने द्यावी अशी मागणी केली जात होती. यातील ज्या विद्यार्थ्यांनी पुणे शहर परीक्षा केंद्र म्हणून निवडले होते अशांना नजीकच्या परीक्षा केंद्रांची निवड करण्याची मुभा मिळाली. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मुंबई, नाशिक तसेच पुणेनजीकच्या जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड केली होती यांना मात्र परीक्षा केंद्र बदलून दिली गेली नाहीत यामुळे विद्यार्थ्यांकडून या गोष्टीचा विरोध केला जात आहे.  एमपीएससीची २० सप्टेंबर रोजी होणारी पूर्व परीक्षा ही रद्द न करता घेण्यात यावी पण  त्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या शहरात परीक्षा केंद्र निवडलेल्या आणि कोरोना काळात स्वगृही परतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या जिल्हा परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्यास मुभा द्यावी अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्यार्थी संघटनांनी याचिका दाखल केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News