सॅनिटरी पॅडबाबत विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

मनिष तरे
Wednesday, 4 March 2020

सामाजिक उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वानगावमधील वनईगावातील तांबुडपाडा आणि माछीपाडा येथील आदिवासी पाड्यातील रहिवास्यांना आशेचा किरण दिला.

मुंबई : विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामाजिक गोष्टींची जाण असणे  आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक उपक्रमांतर्गत विवा महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी वानगावमधील वनईगावातील तांबुडपाडा आणि माछीपाडा येथील आदिवासी पाड्यातील रहिवास्यांना आशेचा किरण दिला. मासिक पाळी दरम्यान कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरणे काळाजी गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून महिलांना पटवून दिले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मराठी पत्रकारिता आणि जाहिरात माध्यमातील विद्यार्थ्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतला. ‘या रे या सारे या, जनजागृती करुया, एकमेकांना सांगुया, सँनिटरी पँड वापरूया...’ अशा घोषणा करत विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन पाड्यातील महिलांना एकत्र आणले. तांबुडपाड्यातील अंगणवाडी शिक्षिकांनी देखील पाड्यातील महिलांना एकत्र आणण्यास मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. 

पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महिलापर्यंत चांगला संदेश पोहचवला. मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरणे गरजेचे आहे हे त्यांनी पाड्यातील महिलांना पटवून दिले. आरोग्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी तसेच कपडा वापरल्याने काय त्रास होतो याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. ‘सँनटरी पँडचा वापर करा, संक्रमण आजार दूर करा’, ‘मासिक पाळी आहे एक नैसर्गिक क्रिया, का देतात लोक संकोची प्रतिक्रीया’ यासारखा संदेश विद्यार्थ्यांनी रहिवास्यांपर्यंत पोहचवला. त्यांनंतर पाड्यातील प्रत्येक स्त्रिला विद्यार्थ्यांच्या हस्ते सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News