परिक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावर निषेध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 July 2020

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावमुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारा आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावमुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारा आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यानुसार देशातील सर्व विद्यापीठांना सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आली आहेत. हा निर्णय सोमवारी ६ जुलैला जसा जाहीर झाला तसा विद्यार्थ्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध करायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात तर पदवी परीक्षाच रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता, पण हा आनंद फार काळ टिकलेला नाही. आता यूजीसीच्या निर्णयामुळे राज्यात परीक्षा होणार की, नाही याची टांगती तलवार विद्यार्थ्यांपुढे आहे. विद्यार्थ्यांचा हा राग सोशल मीडियावर निघत आहे.

 

 

#StudentLives Matter #Cancel_Exam2020 #cancelfinalyearexam #ugc_cancel_exam हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. विद्यार्थी वैयक्तिक त्यांची मते मांडत आहेत मत मांडताना ते या हॅशटॅगचा वापर करत आहेत, परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वगळता इतर सर्व विद्यार्थी संघटनाही या निषेध आंदोलन करण्यात उतरल्या आहेत.

 

 

 

 

 

 

ज्या दिवशी कोविड - १९ संक्रमणग्रस्तांच्या आकडेवारीत भारत जगाच्या पाठीवर तिसऱ्या क्रमांकावर आला, त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने आणि यूजीसीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत मोजून घेतला गेला आहे. यूजीसीने परीक्षा रद्द करायला हव्यात, 'असं मत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (AISA) व्यक्त केलं आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, दिल्लीने देखील यूजीसीच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवला आहे. AISA ने या संपूर्ण प्रकरणाला अभाविपला जबाबदार धरलं आहे.

 

 

 

 

महामारीच्या काळात परीक्षा महत्त्वाची वाटते का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय? डिजीटल डिव्हाइडचा बळी ठरलेल्या वंचितांचं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत आहेत. आयआयटी मुंबई परीक्षा रद्द करू शकते तर विद्यापीठ का नाही, असा प्रश्न एनएसयूआय या काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने उपस्थित केला आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे मत एनएसयूआयने व्यक्त केले आहे.काय आहेत यूजीसीची मार्गदर्शक तत्वे :-


विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घ्याव्या. या परीक्षांसाठी विद्यापीठे ऑफलाइन किंवा ऑनलाइन किंवा दोन्ही पद्धतींचा अवलंब करू शकतात.

 

प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात जागतिक पातळीवर टीकाव धरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या संपूर्ण कौशल्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

 

या नवीन मार्गदर्शक सूचना आल्या तरी २९ एप्रिलच्या सूचना कायम राहतील.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News