विद्यार्थ्यांनी मांडले थेट उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यासमोर गाऱ्हाणे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन आपल्या निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांची संयुक्त बैठक आयोजित केली.

मुंबई: स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (ता. 26) आपल्या निवासस्थानी बैठक आयोजित केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने राबवलेल्या चुकीच्या परीक्षा पॅटर्नमुळे 95 टक्के विद्यार्थी नापास झाले. विद्यापीठाच्या परीक्षा पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे यांनी आंदोलनाला पाठींबा दिला मात्र, विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे प्रा. सुरज दामरे यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यासमोर मांडले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन आपल्या निवासस्थानी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांची संयुक्त बैठक आयोजित केली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव, एसआरटीएम विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य प्रा. सुरज दामरे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, विद्यार्थी नेते श्रीकांत जाधव, राहुल मातोळकर, रवी पिचारे, ऋषिकेश शेटे, संतोष माने, विद्यार्थी रामराजे काळे, चेतन पाटील, अभिजित कसपटे, अभिजित चव्हाण, अनिकेत पाटील, कृष्णा जाधव उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि चार प्रमुख मागण्यांचे निवेदन मंत्री उदय सामंत यांना दिले. मंत्री सावंत यांनी तात्काळ विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश प्रशासनाला दिले.   

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या- 

  • एका दिवशी एकच पेपर घेण्यात यावा
  • विद्यार्थ्यांना आकारण्यात आलेली पुर्नमूल्यांकनाची फि माफ करावी
  • परीक्षेचा निकाल लवकर लागून, तात्काळ फेरपरिक्षा घ्यावी
  • भविष्यातील घेतले जाणारे सर्व निर्णय विद्यार्थ्यांना विचारात घेऊन व विद्यार्थ्यांशी चर्चा करूनच घेतले जावेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News