सर्व परीक्षा MPSC मार्फत घ्या; सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

सर्व विभागाच्या परीक्षा एमपीएससी मार्फर घ्याव्यात अशी मागणी सोशल मीडियावर 24 फेब्रुवारीला #onlympsc हा हॅशटॅग वापरुन केली जाणार आहे, तसेच लोकप्रतिनिधी मार्फत सरकारला निवेदण पाठविले जाणार आहे. सरकराने सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याचा आदेश 1 मार्चपर्यंत काढला नाही तर 2 मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा समितीने दिला आहे.

पुणे : सर्व विभागाच्या ऑनलाईन परीक्षा घेणारं महापोर्टल बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता प्रत्येक विभाग स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेणार आहे मात्र, एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् आणि एमपीएससी समन्वय समितीने ऑनलाईन परीक्षा घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. सर्व विभागाच्या परीक्षा एमपीएससी मार्फर घ्याव्यात अशी मागणी सोशल मीडियावर 24 फेब्रुवारीला #onlympsc हा हॅशटॅग वापरुन केली जाणार आहे, तसेच लोकप्रतिनिधी मार्फत सरकारला निवेदण पाठविले जाणार आहे. सरकराने सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याचा आदेश 1 मार्चपर्यंत काढला नाही तर 2 मार्चपासून उपोषणाला बसण्याचा इशारा समितीने दिला आहे.

ऑनलाईन परीक्षेत घोळ होत आहे म्हणून महापोर्टल बंद करण्याची विनंती विद्यार्थ्यांची केली होती. सरकारने महापोर्टल बंद करुन ऑनलाईन परीक्षा घेण्याचे आधिकर विभागाला दिले आहेत त्यामुळे परीक्षेत भ्रष्टाचार होण्याची शक्याता वर्तवली जात आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीत त्यामुळे परीक्षा देतांना अनेक समस्या निर्माण होतात, त्याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्याचे आधिकार एमपीएससीला द्यावेत अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि संघटनेनी केली आहे.

विद्यार्थी आणि एमपीएससी स्टुडेंट्स राईटस् संघटनेच्या मागणीला आमदार रोहित पवार यांनी सकारात्मकता दर्शवली होती ट्विट करुन पवार म्हणाले, महापोर्टल बंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार. आता दुसरं कोणतंही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ही 'एमपीएससी' मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 'एमपीएससी'ला ताकद द्यावी, ही
विनंती.' ट्विटद्वारे सरकारला केली.

पाहा ट्विट- 

सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्याची मागणी आम्ही केली होती, मात्र सरकारने महापोर्चट बंद करुन विभागांना ऑनलाईन परीक्षा घेण्याचे अधिकार दिले. त्यामुळे पुर्वीपेक्षा अधिक भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. सर्व परीक्षा ऑफलाईन घेण्यासंदर्भात सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी चर्चा करुन निर्णय घ्यावा आणि सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत ऑफलाईन घेण्याचा आदेश काढावा तेव्हाच विद्यर्थ्यांना न्याय मिळेल.
-
किरण निंभोरे, सदस्य, एमपीएससी स्टुडेंट्स राईटस्

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News