परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन मोहीम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 August 2020

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन मोहीम

परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन मोहीम

कोरोनाशी संघर्ष आपण मागील ५ महिन्यांपासून करतोय, दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाला अनेकजण घाबरले आहेत. त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थी वर्ग सुध्दा घाबरला आहे. विशेष म्हणजे जेईई आणि नीटची परीक्षा पुढे ढकवल्यात यावी यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर ऑनलाइन मोहिम राबिवली. या मोहिमेत त्यांनी #INDIAunitedtoPostponeNEET_JEE हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात वापरला.

ट्विटर वापरकर्ता अश्विनी सिंग याने ट्विट मध्ये म्हटलं आहे की, रमेश पोखरियाल सर, तुम्ही तुमच्या घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा आणि कोरोना काळात नीट आणि जेईई परिक्षा पुढे ढकलावी, अशी सुचना केली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांना विनंती केली आहे.€

नीरज झा यांनी सुध्दा ट्विट करत म्हटलंय की, कृपया करून ही परीक्षा पुढे ढकलावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करावा.अजून संसद उघडली नाही, सर्वोच्च न्यायालयानं प्रत्यक्षात सुनावणी सुरू केलेली नाहीये. असं असताना तुम्ही या संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला कसं काय पाठवू शकता?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News