मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम

शुभम पेडामकर
Saturday, 24 October 2020

नऊ विद्यार्थी एका गटात असे नऊ गट बनवून एकूण ८१ विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने संशोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांचा नवरात्री उत्सवानिमित्त संशोधन उपक्रम

सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही संस्था तंबाखू नियंत्रण जनजागृती सोबतच जीवन कौशल्य विकास या विषयाला धरून महापालिका शाळा व अनुदानित शाळांमध्ये कार्य करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्ये व सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी अनेक उपक्रमांची निर्मिती संस्था करते. मीडिया अकादमी अंतर्गत विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन आणि संवादाच्या कलेला वाव देण्यासाठी नवरात्री उत्सवानिमित्ताने संशोधनात्मक उपक्रम राबविला जात आहे.

भविष्यात माध्यम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत पत्रकारिता क्षेत्रात जो भाग आवर्जून केला जातो तो म्हणजे संशोधन. या संशोधनातून एक छोटेखानी कार्यकृती व्हिडिओ विद्यार्थांनी तयार केली आहे. या उपक्रमा अंतर्गत नवरात्रीचे नऊ दिवस लक्षात घेऊन स्त्रियांबद्दल असणारे प्रश्न मग ते शिक्षण आणि महिला असो अथवा घरगुती हिंसाचार असो अथवा स्त्रियांचा सन्मान त्यांच्या इतर बाबी या सगळ्या प्रश्नांवर छोटेखानी सूक्ष्मलक्षी संशोधन केले आहे. त्याचबरोबर केवळ एवढ्यावरच न थांबता त्या समस्यांचे निराकरण कश्या पध्दतीने करता येऊ शकेल यावर उपाय सुद्धा शोधून काढले आहेत.

नऊ विद्यार्थी एका गटात असे नऊ गट बनवून एकूण ८१ विद्यार्थ्यांनी आपापल्या परीने संशोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. संशोधनात विद्यार्थ्यांनी संबंधित विषयावर या आधी कोणी संशोधन केले होते का? केले असेल तर त्याचे पुरावे , त्याचबरोबर प्रतिक्रिया, मुलाखती आणि डेटा साठी सर्वेक्षण फॉर्म चा अवलंब केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News